रणबीरच्या बहिणीचा 15 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यावर होता क्रश; ऐकून पत्नी म्हणाली “हिंमतसुद्धा करू नकोस..”

'फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स' या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये रणबीर कपूरच्या बहिणीने मोठा खुलासा केला. तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या एका अभिनेत्यावर क्रश असल्याचं तिने सांगितलं. हे ऐकून त्या अभिनेत्याची पत्नी म्हणाली, "हिंमतसुद्धा करू नकोस.."

रणबीरच्या बहिणीचा 15 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यावर होता क्रश; ऐकून पत्नी म्हणाली हिंमतसुद्धा करू नकोस..
Ranbir Kapoor and Riddhima SahniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 10:16 AM

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींच्या पत्नींचं आलिशान आयुष्य कसं असतं, हे दाखवणाऱ्या या सीरिजमध्ये यंदा तीन नवीन सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी. रिद्धिमासोबतच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर, समीर सोनीची पत्नी नीलम कोठारी, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह हेसुद्धा या शोमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याविषयी विविध खुलासे करताना दिसतात. या शोमध्ये रिद्धिमाने तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेला अभिनेत्यावर क्रश असल्याचा खुलासा केला.

एका एपिसोडमध्ये रिद्धीमा महीप कपूरला सांगते, “महीप, तुला माहितीये का? मी लहानाची मोठी होत असताना मला संजय खूप आवडायचा.” महीप ही अभिनेता संजय कपूरची पत्नी आहे. रिद्धिमाच्या तोंडून हे ऐकल्यानंतर नीलम कोठारी आश्चर्य व्यक्त करते. “काय म्हणतेस”, असं ती रिद्धिमाला म्हणते. त्यावर उत्तर देताना रिद्धिमा पुढे सांगते “मी खरंच सांगतेय, संजय कपूरवर माझं खूप क्रश होतं. त्यावेळी मी त्यांना ‘अंकल’ (काका) असं म्हणायचे. पण मला ते खूप आवडायचे. पण आता मी त्यांना काय म्हणून हाक मारू?”

हे सुद्धा वाचा

रिद्धिमाची कबुली ऐकल्यानंतर महीप म्हणते, “मला तू अजिबात आंटी (काकी) म्हणण्याची हिंमत करू नकोस. मी तुला खूप मारेन. पण हे खूप क्युट आणि गोड आहे. रिद्धिमाची पुरुषांबद्दलची आवड चांगली आहे.” या शोच्या दुसऱ्या एका एपिसोडमध्ये महीप हीच गोष्ट चंकी पांडेला सांगते. “रिद्धिमा लहान असताना संजय तिचा क्रश होता”, असं ती म्हणते. हे ऐकून चकीत झालेला चंकी पांडे लगेच रिद्धिमाकडे वळत म्हणतो, “तुला माहितीये का, माझी क्रश तुझी आई होती. मला ती खूप आवडायची. तिच्यासाठी मी वेडा होतो.”

याच शोमध्ये महीपने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता. पती संजय कपूरच्या फसवणुकीबाबत महीप म्हणाली होती, “माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजयने नात्यात माझी फसवणूक केली. तेव्हा मी शनायाला घेऊन घराबाहेर पडले होते. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं. माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं ही भावना मनात होती. जर मी त्यावेळी हे नातं मोडलं असतं तर मी आयुष्यभर पश्चात्ताप केला असता. कारण आता जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझा पती जेव्हा घरात येतो, तेव्हा त्यांच्यासाठी ती जागा सर्वांत सुंदर असते. ती शांतता अनुभवणं त्यांची गरज आहे आणि तीच शांतता संजय मलाही देतो.”

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.