‘IC 814: द कंदहार हायजॅक’मध्ये काय खोटं दाखवलंय? खऱ्या पायलटकडून खुलासा

या सीरिजची कथा पत्रकार श्रीजॉय चौधरी आणि देवी शरण, हायजॅक झालेल्या फ्लाइटचे कॅप्टन यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइट इन्टू फिअर: द कॅप्टन्स स्टोरी’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सीरिज 29 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

‘IC 814: द कंदहार हायजॅक’मध्ये काय खोटं दाखवलंय? खऱ्या पायलटकडून खुलासा
पायलट देवी शरण, अभिनेता विजय वर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 12:29 PM

‘आयसी 814: द कंदहार हायजॅक’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये दहशतवाद्यांची नावं बदलण्याचा आरोप काहींनी केला असून त्यावर बंदीची मागणी केली जात आहे. निर्मात्यांनी जाणीवपूर्वक दहशतवाद्यांची नावं बदलली, असा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. सीरिजला वाढता विरोध पाहता अखेर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुखांना समन्स बजावले होते. एकीकडे सोशल मीडियावर या सीरिजला तीव्र विरोध होत असतानाच आता हायजॅक करून कंदहारला घेऊन गेलेल्या विमानाचे खरे पायलट देवी शरण यांनी सीरिजमधील दोन चुकांचा खुलासा केला आहे.

1999 मध्ये जेव्हा काठमांडू ते दिल्लीसाठी निघालेली इंडियन एअरलाइन्सची फ्लाइट IC 814 हायजॅक करण्यात आली होती, तेव्हा त्याचे पायलट कॅप्टन देवी शरण होते. वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्माने या पायलटची भूमिका साकारली आहे. आता देवी शरण यांनीच अशा दोन गोष्टींचा खुलासा केला आहे, ज्या घडल्या नव्हत्या. मात्र सीरिजमध्ये त्या घटना दाखवल्या गेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

वेब सीरिजमध्ये विमान जेव्हा कंदहारला पोहोचतं तेव्हा त्याचा टॉयलेट चोक होतो. त्यानंतर पायलटच्या भूमिकेतील विजय वर्मा स्वत: प्लंबिंग लाइनला क्लिअर करतो. ते साफ करून जेव्हा तो परततो, तेव्हा विमानातील सर्व प्रवासी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करतात. मात्र खऱ्या आयुष्यात घटना अशी घडली नव्हती. ‘द टेलीग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत देवी शरण यांनी सांगितलं, “मी स्वत: प्लंबिंग लाइन रिपेअर केली नव्हती. तालिबान अधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याला पाठवलं होतं. त्याला घेऊन मी खाली एअरक्राफ्ट होल्डमध्ये उतरलो होतो, कारण प्लंबिंग लाइन्स कुठे असतात, हे त्याला माहित नव्हतं. सीरिजमध्ये दाखवलंय की पायलटने स्वत: ते पाइपलाइन रिपेअर केलं. तर असं काहीच नव्हतं.”

View this post on Instagram

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

या वेब सीरिजमध्ये आणखी एक सीन आहे, ज्यामध्ये हायजॅक संपल्यानंतर बाहेर येणाऱ्या पायलटला परराष्ट्र मंत्र्यांच्या भूमिकेतील अभिनेते पंकज कपूर सॅल्यूट करतात. देवी शरण यांनी सांगितलं की खऱ्या आयुष्यात असं काही घडलंच नव्हतं. “तेव्हाचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी मला सलाम केला नव्हता. मात्र त्यांनी एक जेस्चर नक्कीच केलं होतं, जे आमच्या प्रयत्नांच्या कौतुकासाठी होतं. पण ते सेल्युट मात्र नव्हतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

खऱ्याखुऱ्या हायजॅकिंगच्या घटनेवर आधारित या सीरिजमध्ये शेकडो प्रवाशांचा त्रासदायक अनुभव आणि त्यांची सुटका करताना सरकारसमोरील आव्हानांचं चित्रण करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान नियंत्रित कंदाहार याठिकाणी पोहोचण्याआधी ती फ्लाइट अनेक ठिकाणी वळवण्यात आली होती. सीरिजमधील हायजॅकर्सना चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी सांकेतिक नावं देण्यात आली आहेत. यातील भोला आणि शंकर या नावांच्या वापरामुळेच सीरिजवर टीका होत आहे. यात मुद्दाम हिंदू नावं निवडल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.