Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील ‘या’ परिसरात मुस्लिमांना कोणी घर देत नाही? सैफ अली खानचा जुनी मुलखत व्हायरल

Saif Ali Khan: मुंबईतील 'या' हाय प्रोफाईल परिसरात मुस्लिमांना कोणी घर देत नाही? सैफ अली खान याचा मोठा खुलासा... सैफ अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

मुंबईतील 'या' परिसरात मुस्लिमांना कोणी घर देत नाही? सैफ अली खानचा जुनी मुलखत व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 29, 2025 | 11:08 AM

अभिनेता सैफ अली खान आता वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये कुटुंबासोबत राहत आहे. पण अभिनेत्याला मुंबईतील जुहू याठिकाणी घर खरेदी करायचं होतं. पण अभिनेत्याला जुहू याठिकाणी घर खरेदी करता आलं नाही. एका मुलाखतीत अभिनेत्याने मागचं कारण देखील सांगितलं होतं. मुस्लिम असल्यामुळे मला जुहू याठिकाणी घर खरेदी करता आलं नाही… असं अभिनेता एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता.

मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता, ‘एक मुसलमान असून तुम्ही जुहू याठिकाणी घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, ‘आम्ही मुस्लिम लोकांना घर देत नाही..’ असं बोलून नकार दिला जातो.’ एवढंच नाही तर, अभिनेत्याने भारतात होणाऱ्या भेदभावावर देखील मोठं वक्तव्य केलं.

‘मानवी स्वभाव कधीच साधा असू शकत नाही आणि तो कधी होणार देखील नाही… एक पुरुष त्याच्या बायकोसोबत भांडतो, भावंड एकमेकांसोबत भांडतात… हे स्वाभाविक आहे. एक देश दुसऱ्या देशासोबत भांडतो. एक धर्म दुसऱ्या धर्मासोबत भांडतो… भांडणं सामान्य आहे. मला असं वाटतं की शांती आणि समज असामान्य आहे.’ असं अभिनेता म्हणाला.

सैफ अली खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या 16 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे. हल्लेखोराने गंभीर वार केल्यानंतर सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थीर असून डॉक्टरांनी एक महिना आराम करण्याचा सल्ला सैफ याला दिला आहे.

सैफच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, हल्ला होण्यापूर्वी सैफ ‘ज्वेल थीफ : द रेड सन चॅप्टर’ सिनेमाचं शुटिंग करत होता. आता अभिनेत्याची प्रकृती पाहता दिग्दर्शकाने सिनेमाची शुटिंग काही काळासाठी रद्द केली आहे. ‘ज्वेल थीफ : द रेड सन चॅप्टर’ सिनेमा शिवाय सैफ अली खान ‘रेस 4’, ‘स्पिरिट’, ‘देवरा: पार्ट 1’, ‘देवरा: पार्ट 2’ सिनेमात देखील दिसणार आहे.

तामीळ दिग्दर्शक बालाजी मोहन दिग्दर्शित ‘क्लिक शंकर’ सिनेमात देखील सैफ झळकणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट एट बायकुला’ सिनेमात देखील सैफ दिसणार आहे. एवढंच नाही तर, लेक सारा अली खान हिच्यासोबत देखील सैफ पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सारा आणि सैफ यांच्या सिनेमा संबंधी अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले.
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस.
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख.
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच...
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच....
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका.
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?.
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स.