IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

अबु धाबीमधील यास आयलँडवर सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जीने बाजी मारली आहे. तर इतर पुरस्कार कोणाला मिळाले, ते पाहुयात..

IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 10:50 AM

अबु धाबीमधील यास आयलँडवर अत्यंत प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींची या सोहळ्याला उपस्थिती पहायला मिळाली. हेमा मालिनी, रेखा, शाहरुख खान, राणी मुखर्जी, अनिल कपूर, बॉबी देओल, विकी कौशल, शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांसारख्या सेलिब्रिटींनी या पुरस्कार सोहळ्याला चार चाँद लावले. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने आयफा पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. विकी कौशल आणि करण जोहरने त्याची साथ दिली. यावेळी त्याने ‘झुमे जो पठान’ या गाण्यावर डान्ससुद्धा सादर केला.

विजेत्यांची संपूर्ण यादी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान (जवान) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (बारवी फेल) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अनिल कपूर (ॲनिमल) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहान) सर्वोत्कृष्ट खलनायकी अभिनेता- बॉबी देओल (ॲनिमल) सर्वोत्कृष्ट कथा- रॉकी और रानी की प्रेम कहानी सर्वोत्कृष्ट कथा (ॲडाप्टेड)- बारवी फेल सर्वोत्कृष्ट संगीत- ॲनिमल सर्वोत्कृष्ट गाण्याचे बोल- सिद्धार्थ गरिमा (सतरंगा, ॲनिमल) सर्वोत्कृष्ट गायक- भूपिंदर बब्बल (अर्जन वेल्ली, ॲनिमल) सर्वोत्कृष्ट गायिका- शिल्पा राव (चलेया) भारतीय सिनेमातील अमूल्य योगदान- जयंतीलाल गडा, हेमा मालिनी सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल- करण जोहर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खान म्हणाला, “रणवीर सिंग, रणबीर कपूर, विक्रांत मेस्सी, विकी कौशल, सनी पाजी या सर्व नामांकित झालेल्या कलाकारांचे मी आभार मानतो. सर्वांनी खूप चांगलं काम केलंय, पण कदाचित मी बऱ्याच काळानंतर चित्रपटात परतल्याने प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. म्हणून मला हा पुरस्कार मिळाला आहे. मी पत्नी गौरीचेही खूप आभार मानतो. कारण ती एकमेव अशी पत्नी असेल जी पतीवर जास्त पैसा खर्च करत असेल. जवान या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता.”

हे सुद्धा वाचा

27 सप्टेंबर रोजी ‘आयफा उत्सवम’ पार पडला. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.