IIFA Awards 2024: पाच फिल्म इंडस्ट्रीजचा भव्यदिव्य उत्सव; 3 दिवसांच्या ‘आयफा अवॉर्ड्स’मध्ये काय काय पहायला मिळणार?
27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत भव्यदिव्य आयफा पुरस्कार सोहळा पार पडत आहे. अबु धाबीमधील यास आयलँडवर हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हिंदीसह चार दाक्षिणात्य भाषांमधील नामांकित सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित आहेत.
अबू धाबीमधील यास आयलँडवर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळा पार पडतोय. 27 ते 29 सप्टेंबर असे तीन दिवस हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अबु धाबीमधील इतिहाद अरेना याठिकाणी हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा पार पडत आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा विविध कारणांमुळे खास ठरला आहे. यावेळी पाच विविध इंडस्ट्रीमधील कलाकार एकत्र आले आहेत. 27 सप्टेंबर रोजी ‘आयफा उत्सवम अवॉर्ड्स’ सोहळा पार पडला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्यात जल्लोष केला. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठीचा पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी संगीत, फॅशन आणि मनोरंजनाचा जागर होणार आहे.
IIFA चे संस्थापक/संचालक आंद्रे टिमिन्स म्हणाले, “सिनेसृष्टीतील पाच प्रतिष्ठित इंडस्ट्रीजसाठी आम्ही या वर्षातील सर्वांत मोठा आणि नेत्रदीपक असा आयफा पुरस्कार सोहळा आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळाली. हा संपूर्ण प्रवास खूप उत्साहपूर्ण होता. विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ऐतिहासिक पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीची भव्यता पाहायला मिळाली. पुरस्कार सोहळ्याची सर्व तिकिटं विकली गेली आहेत, यावरूनच प्रेक्षकांचा उत्साह स्पष्ट दिसून येतोय. हा पुरस्कार सोहळ्या अनेक अर्थांनी अविस्मरणीय ठरणार आहे. सिनेमाचा हा भव्य उत्सव जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करून त्यांच्यावर कायमस्वरुपी आपली छाप सोडेल.”
27 सप्टेंबरच्या ‘आयफा उत्सवम’चे सूत्रसंचालक-
तेलुगू- राणा डग्गुबत्ती आणि तेजा सज्जा कन्नड- अकुल बालाजी आणि विजय राघवेंद्र तमिळ- सतिश आणि दिया मेनन मल्याळम- सुदेव नायर आणि पर्ले मानी
‘आयफा उत्सवम’मध्ये परफॉर्म करणारे सेलिब्रिटी-
प्रभू देवा रॉकस्टार डीएपी शेन निगम राशी खन्ना प्रज्ञा जैसवाल मलश्री रेजिना कॅसांड्रा
‘आयफा उत्सवम’मध्ये सहभागी होणारे सेलिब्रिटी-
तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चारही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार या पुरस्कार सोहळ्या आवर्जून उपस्थित होते. यामध्ये चिरंजीनी, रामचरण, राणा डग्गुबती, तेजा सज्जा, विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, एस. जे. सूर्या, समंथा रुथ प्रभू, जिवा, मृणाल ठाकूर, नानी, मणीरत्नम, ए. आर. रेहमान, बालकृष्ण, जयम रवी, किर्ती सुरेश, इंद्रजीत सुकुमारन, अनास्वरा राजन, ममिता बायजू, श्रद्धा श्रीनाथ, ब्रह्मानंदम, शाइन टॉम चॅको यांचा समावेश आहे.
28 सप्टेंबर रोजी ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालक-
शाहरुख खान, करण जोहर आणि विकी कौशल
आयफा पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणारे सेलिब्रिटी-
रेखा, शाहिद कपूर, विकी कौशल, क्रिती सनॉन, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे
29 सप्टेंबर रोजी ‘आयफा रॉक्स’चं सूत्रसंचालन करणारे-
सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी
‘आयफा रॉक्स’मध्ये परफॉर्म करणारे सेलिब्रिटी-
शंकर-एहसान-लॉय, शिल्पा राव, हनी सिंग आणि लुलिया वंतूर
यास आयलँडविषयी-
यास आयलँड हे अबू धाबीपासून फक्त 20 मिनिटं आणि दुबईपासून 50 मिनिटांच्या अंतरावर असून हॉलिडेसाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. या आयलँडवर पुरस्कार विजेते विविध थीम पार्क्स आहेत. यामध्ये फेरारी वर्ल्ड, यास वॉटरवर्ल्ड, वॉर्नर ब्रोज वर्ल्ड यांचा समावेश आहे. त्याचसोबत रेकॉर्ड ब्रेकिंग CLYMB™ यास आयलँड, अबू धाबी आणि रोमांचकारी यास मरीना सर्किट (फॉर्म्युला 1 एतिहाद एअरवेज अबू धाबी ग्रँड प्रिक्सचं माहेरघर) यांसारखीही बरीच आकर्षणं याठिकाणी आहेत.
अबू धाबीमधील सर्वांत मोठा ‘यास मॉल’सुद्धा या बेटावरच आहे. याठिकाणी वर्ल्ड क्लास शॉपिंगचा आनंद लुटता येतो. त्याचप्रमाणे यास बे वॉटरफ्रंट, दिवसा आणि रात्रीही अनुभवता येतील अशी अबू धाबीमधील इतर आकर्षणं, यास लिंक्स गोल्फ कोर्सवरील पुरस्कारप्राप्त गोल्फ ही ठिकाणंही पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.
या बेटावर वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. संगीत, करमणूक आणि इतरही कौटुंबिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे डब्ल्यू अबू धाबी – यास आयलंड, हिल्टन अबू धाबी यास आयलंड आणि द WB™ अबू धाबी, जगातील पहिलं वॉर्नर ब्रदर्स थीम हॉटेल अशी विविध दहा अप्रतिम हॉटेल्स या बेटावर आहेत. या बेटावरील 165 हून अधिक रेस्टॉरंट्समध्ये पर्यटक विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. त्याचप्रमाणे व्हाइट अबू धाबी आणि इतिहाद अरेना याठिकाणी इनडोअर आणि आऊटडोअर कॉन्सर्टदेखील आयोजित केले जातात. या सर्व ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सेवा उपलब्ध आहेत. या ठिकाणावरील पहिलं मरीन लाइफ थीम पार्क ‘सीवर्ल्ड यास आयलंड’, अबु धाबी नुकतंच सुरू झाल्यामुळे यास बेटावर आणखी एक आकर्षण जोडलं गेलंय.
अबू धाबीमधील संस्कृती आणि पर्यटन विभागाबद्दल-
अबू धाबीचं संस्कृती आणि पर्यटन विभाग हे पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासोबतच सर्जनशील उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक ती पाऊलं उचलत आर्थिक प्रगतीला प्रोत्हासन देण्याचा प्रयत्न करतेय. अबू धाबीच्या व्यापक जागतिक महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी हे विभाग प्रयत्नशील आहे. अमिरातीतील लोक, त्यांचा वारसा आणि तिथल्या विविध ठिकाणांचा प्रभाव डीटीसी अबू धाबीच्या दूरदृष्टीवर पहायला मिळतो.