Ileana D’Cruz: कोण आहे इलियानाच्या होणाऱ्या बाळाचा बाप? बॉयफ्रेंडचा फोटो पहिल्यानंतर व्हाल थक्क
लग्नाआधी इलियाना देणार बॉयफ्रेंडच्या मुलाला जन्म; कोण आहे अभिनेत्रीच्या होणाऱ्या बाळाचा बाप? फोटो पहिल्यानंतर व्हाल थक्क... सध्या सर्वत्र इलियानाच्या बॉयफ्रेंडची चर्चा
मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. इलियाना सतत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. इलियाना हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची माहिती दिली. पण अभिनेत्रीच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे… याबद्दल अभिनेत्रीने मौन बाळगलं आहे. पण आता इलियानाने बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक पोझ दिली आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यातील मिस्ट्रीमॅन कोण आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगत आहे.
बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये, ‘प्रेग्नेंट असणं हा सुंदर आशीर्वाद आहे… हा आनंद अनुभवण्यासाठी मला नाही वाटत का मी इतकी भाग्यवान आहे. या प्रवासात मी स्वतःला भाग्यशाली समजते. एक आयुष्य तुमच्यामध्ये मोठं होत आहे… ही भावना व्यक्त करणं देखील शक्य नाही.’ असं अभिनेत्री म्हणाली.
शिवाय प्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या मून स्विंग्सबद्दल देखील पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. ‘जेव्हा मी स्वतःची काळजी घेवू शकत नाही, तेव्हा माझा बॉयफ्रेंड माझ्या सोबत असतो. माला जेव्हा अस्वस्थ वाटतं तेव्हा तो मला सांभाळून घेतो. माझे अश्रू पूसतो. एवढंच नाही तर, स्वतःच्या विनोदबुद्धीने मला पोट धरुन हसवतो.. जेव्हा मला त्याची गरज असते, तेव्हा तो मला मिठी मारतो… ‘ असं देखील अभिनेत्री पोस्ट मध्ये म्हणाली.
इलियानाने याआधी देखील बॉयफ्रेंडचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोमध्ये अभिनेत्री अंगठीचा फोटो शेअर केला होता. शिवाय अभिनेत्रीने बेबी बम्पचा फोटो देखील शेअर केला होता. इलियाना कायम सोशल मीजियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे..
दरम्यान प्रेंग्नेसीमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत फोटो तर पोस्ट केला आहे. पण तो कोण आहे हे स्पष्ट दिसत नाही. शिवाय अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या नावाचा देखील उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अभिनेत्रीच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे.. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीची घोषणा केली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पण लग्नाआधी आई होणार असल्याची घोषणा केल्यामुळे इलियानाला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला.