Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMDb Top 10 Stars: IMDb टॉप स्टार्समध्ये साऊथ सुपरस्टार्सचा डंका; दीपिका-कतरिना यादीतून गायब

IMDb कडून टॉप 10 लोकप्रिय सेलिब्रिटींची यादी जाहीर; पुन्हा एकदा साऊथ सुपरस्टार्सने बॉलिवूडला टाकलं मागे

IMDb Top 10 Stars: IMDb टॉप स्टार्समध्ये साऊथ सुपरस्टार्सचा डंका; दीपिका-कतरिना यादीतून गायब
IMDb Top 10 Stars: IMDb टॉप स्टार्सच्या यादीत साऊथ सुपरस्टार्सचा डंकाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 9:44 AM

मुंबई: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या टॉप 10 सेलिब्रिटींची यादी IMDb ने जाहीर केली. या यादीत साऊथ सुपरस्टार धनुष अग्रस्थानी आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींचा टॉप 10 मध्ये समावेशच नाही. यंदा फक्त चित्रपटांच्या बाबतीतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीने बाजी मारली नाही. तर लोकप्रिय सेलिब्रिटींच्या बाबतीतही त्यांनी या यादीत बाजी मारली आहे.

IMDb ने जाहीर केलेली टॉप 10 लोकप्रिय स्टार्सची यादी-

1- धनुष 2- आलिया भट्ट 3- ऐश्वर्या राय बच्चन 4- रामचरण तेजा 5- समंथा रुथ प्रभू 6- ऋतिक रोशन 7- कियारा अडवाणी 8- एन. टी. रामा राम ज्युनिअर 9- अल्लू अर्जुन 10- यश

हे सुद्धा वाचा

साऊथ स्टार्सचा डंका-

2022 च्या IMDb टॉप 10 सेलिब्रिटींमध्ये साऊथच्या सेलिब्रिटींचा दबदबा पहायला मिळाला. यंदा एक किंवा दोन नाही तर सहा साऊथ सेलिब्रिटींचा टॉप 10 मध्ये सहभाग आहे. धनुष, रामचरण, समंथा, ज्युनिअर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि यश यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवलंय.

यापैकी अल्लू अर्जुन ‘पुष्पा’मुळे आणि रामचरण, ज्युनिअर एनटीआर हे ‘RRR’ चित्रपटामुळे वर्षभर चर्चेत राहिले. तर यशच्या केजीएफ 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. गंगुबाई काठियावाडीतील भूमिकेमुळे आलिया भट्टचं कौतुक झालं. तर ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळेही ती चर्चेत होती. जुग जुग जियो आणि भुल भुलैय्या 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने टॉप 10 मध्ये आपली जागा बनवली.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन- 1’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. तिच्या अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली. म्हणूनच या यादीत तिने तिसरं स्थान मिळवलंय.

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.