IMDbने जाहीर केली टॉप 10 चित्रपट आणि वेब सीरिजची यादी; पहा प्रेक्षकांची पसंती नेमकी कोणाला?
या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.
इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच आयएमडीबीने (IMDb) या वर्षातील आतापर्यंतच्या टॉप 10 भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. बुधवारी इन्स्टाग्रामवर त्यांनी ही यादी पोस्ट केली आहे. या यादीत द काश्मीर फाइल्स, RRR, अ थर्स्ट डे, विक्रम यांसारख्या चित्रपटांनी बाजी मारली आहे. तर पंचायत, कॅम्पस डायरीज, अपहरण या वेब सीरिजचा प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या यादी शेअर करत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. RRR या चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला फक्त भारतातच नाही तर जगभरात खूप चांगला प्रतिसाद मिळाल. तर यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कामिगिरी केली.
IMDB नुसार टॉप 10 भारतीय चित्रपट
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
विक्रम: 8.8/10 केजीएफ चाप्टर 2: 8.5/10 द काश्मीर फाइल्स: 8.3/10 हृदयम: 8.1/10 RRR (Rise Roar Revolt): 8/10 अ थर्स्ट डे: 7.8/10 झुंड: 7.4/10 सम्राट पृथ्वीराज: 7.2/10 रनवे 34: 7.2/10 गंगुबाई काठियावाडी: 7/10
IMDB नुसार टॉप 10 भारतीय वेब सीरिज
View this post on Instagram
कॅम्पस डायरीज: (9/10) रॉकेट बॉईज: 8.9/10 पंचायत: 8.9 ह्युमन: 8/10 अपहरण: 8.4/10 एस्काइप लाइव्ह: 7.7/10 द ग्रेट इंडियन मर्डर: 7.3/10 माई: 7.2/10: द फेम गेम: 7/10 ये काली काली आँखे: 7/10
IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?
आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.