13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबतच्या मैत्रीला वडिलांचा विरोध; अखेर नात्यावर सुंबुलने सोडलं मौन

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुंबुल तौकिर खानने अभिनेता फहमान खानसोबतच्या वादाविषयी अखेर मौन सोडलं आहे. ईमली या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. याच मालिकेदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली होती. मात्र सुंबुलच्या वडिलांमुळे त्यांची मैत्री मोडल्याचं म्हटलं जातं.

13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबतच्या मैत्रीला वडिलांचा विरोध; अखेर नात्यावर सुंबुलने सोडलं मौन
Fahman Khan and Sumbul Touqeer KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 2:49 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : ‘ईमली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर खान सध्या ‘काव्या’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. ईमली या मालिकेनंतर सुंबुलने ‘बिग बॉस’च्या सोळाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’च्या घरातील तिचं बिनधास्त वागणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत होतं. या सर्व गोष्टींसोबतच ‘ईमली’ या मालिकेत तिच्यासोबत भूमिका साकारलेला अभिनेता फहमान खानसोबतची तिची मैत्री विशेष चर्चेत आली होती. या मालिकेत एकत्र काम करताना फहमान आणि सुंबुल यांच्यात चांगली मैत्री झाली होती. मात्र काही कारणास्तव या दोघांच्या मैत्रीत कटुता निर्माण झाली. आता फहमान आणि सुंबुल एकमेकांशी बोलतही नाहीत. या वादावर अखेर सुंबुलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुंबुलला फहमानविषयी प्रश्न विचारण्यात आला. फहमान आणि तू आता संपर्कात आहात का? फहमानसोबतच्या मैत्रीला तू मिस करतेस का असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुंबुल म्हणाली, “मी त्याविषयी बोलण्यासाठी आतासुद्धा तयार नाही. मी फक्त फहमानला ऑल द बेस्ट इतकंच म्हणू शकते. त्या व्यतिरिक्त मला काहीच बोलायचं नाही.”

सुंबुलला फहमानसोबतची मैत्री तिच्या वडिलांमुळे सोडावी लागली, असं म्हटलं जातं. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी या दोघांनी एक म्युझिक व्हिडीओ शूट केला होता. त्याच्या ‘बिहाइंड द सीन’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून सुंबुलच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीमुळेच सुंबुल आणि फहमान यांची मैत्री तुटली असं म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर सुंबुलच्या वडिलांनी आक्षेप घेतल्यानंतर हा म्युझिक प्रदर्शित होऊ शकला नव्हता.

हे सुद्धा वाचा

सुंबुलने ‘इमली’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील मुख्य अभिनेता फहमान खान याच्याशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सुंबुल आणि शालीन भनोत यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. तेव्हा “बिग बॉसच्या घरात वावरणारी ती माझी मुलगीच नाही”, अशी थेट प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली होती. इतकंच नव्हे तर तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यासाठी मतं द्या, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली होती.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.