घटस्फोटानंतर इमरान खानच्या आयुष्यात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची एण्ट्री

'जाने तू या जाने या' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेता इमरान खान अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाला. इमरान हा आमिर खानचा भाचा असून त्याचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. अवंतिका मलिकला घटस्फोट दिल्यानंतर आता इमरानच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे.

घटस्फोटानंतर इमरान खानच्या आयुष्यात 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीची एण्ट्री
Imraan Khan and Lekha WashingtonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 4:00 PM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खान बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र इमरान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो. गेल्या काही महिन्यांपासून इमरानच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. पत्नी अवंतिका मलिकला घटस्फोट दिल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. नुकतंच इमरानला अभिनेत्री क्रिती खरबंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पाहिलं गेलं. या पार्टीत तो त्याच खास व्यक्तीसोबत पोहोचला होता. या खास व्यक्तीला इमरान डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ही व्यक्ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इमरान आणि लेखा एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी ‘मटरू की बिजली का मन डोला’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या डेटिंगची चर्चा खरी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. इमरान खानने बालमैत्रीण अवंतिका मलिकशी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2019 मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दोघांना एक मुलगी आहे. तर 2021 पासून इमरान आणि लेखाच्या अफेअरची चर्चा रंगतेय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

इमरानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्याने 2008 मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2015 मध्ये तो ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर तो चित्रपटांपासून दूर गेला. तर नुकतंच त्याने ‘मिशन मार्स: किप वॉकिंग इंडिया’ या लघुपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. इमरानने ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘डेल्ली बेली’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.