याच्याकडे पैसा कुठून येतोय? चाहत्याच्या प्रश्नाला इमरान खानचं मजेशीर उत्तर

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने या’ चित्रपटातून इमरानने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्यानंतरही तो काही चित्रपटांमध्ये झळकला, मात्र अपेक्षित असं यश त्याला मिळालं नाही.

याच्याकडे पैसा कुठून येतोय? चाहत्याच्या प्रश्नाला इमरान खानचं मजेशीर उत्तर
Imran KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 3:22 PM

अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या चित्रपटांमध्ये काम करत नसला तरी सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. इमरानने स्वत: बांधलेल्या घराची झलक या फोटोंमध्ये पहायला मिळतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने घर बांधण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि अनुभव कसा होता, याविषयी सांगितलं. इमरानचं हे प्रशस्त घर पाहिल्यानंतर त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मात्र एका नेटकऱ्याच्या प्रश्नाने इमरानचं लक्ष वेधलं. “याच्याकडे पैसा कुठून येतो?”, असा सवाल करणाऱ्या युजरला इमरानने मजेशीर उत्तर दिलं आहे. त्याच्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

इमरानने या पोस्टमध्ये सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून तो हे घर बांधतोय. इमरानने गेल्या काही वर्षांपासून कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. त्यामुळे त्याच्याकडे इतकं मोठं घर बांधायला पैसा कुठून आला, असा प्रश्न एका नेटकऱ्याला पडला. त्यावर उत्तर देताना इमरानने लिहिलं, ‘साल 2000 च्या मध्यात मी काही चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.’ इमरानच्या या उत्तरावर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

इमरान खानने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये जिनिलिया डिसूझासोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटामुळे इमरान रातोरात स्टार बनला होता. त्यानंतर त्याने ‘डेल्ली बेल्ली’, ‘लक’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘एक मैं और एक तू’, ‘कट्टी बट्टी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2015 मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित जाला होता. त्याच्या तीन वर्षांनंतर त्याने ‘मिशन मार्स: कीप वॉकिंग इंडिया’ या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं होतं.

एका मुलाखतीत इमरान त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी व्यक्त झाला होता. इमरानला त्याची महागडी फरारी कार विकावी लागली होती. आर्थिक तंगीमुळे त्याने पाली हिल इथला बंगलासुद्धा विकला होता. बंगला विकून इमरान एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागला आहे. सध्या इमरान अत्यंत साधं आयुष्य जगतोय. माझ्या किचनमध्ये फक्त तीन प्लेट, तीन चमचे, दोन कॉफी मग आणि एक फ्राइंग पॅन आहे, असं त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं. 2016 पासून स्वत:चे केस स्वत:च कापत असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.