‘घटस्फोट माझ्यासाठी सर्वात…’, Imran Khan याची पत्नी अवंतिकाच्या पोस्टची सर्वत्र चर्चा
अभिनेता आमिर खान याचा भाचा इमरान खान आणि अवंतिका मलिक यांच्या नात्याची चर्चा... अभिनेत्याची पत्नी पोस्ट शेअर म्हणाली, 'घटस्फोट माझ्यासाठी सर्वात...'
मुंबई : अभिनेता इमरान खान (Imran Khan) याने ‘जाने तू या जाने ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्याच्या पहिल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण त्यानंतर अभिनेत्याला अभिनय क्षेत्रात मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील अभिनेता सक्रिय नसतो. पण आता पुन्हा अभिनेता नात्यामुळे चर्चेत आला आहे. इमरान खान आणि पत्नी अवंतिका मलिक गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत आहेत. पण अवंतिकाच्या एका पोस्टमुळे त्याचं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे.
अवंतिका मलिक हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रसिद्ध हॉलीवूड गायिका मायली सायरसचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ तिने स्टोरीला शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘घटस्फोट तिच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट होती’ असं लिहिलंय. पुढे तिने लिहिलं आहे की, ‘ फक्त तिच्यासाठी नाही…’ शिवाय अवंतिकाने #justsaying या हॉशटॅगचा देखील वापर केला आहे.
अवंतिका मलिक हिच्या या पोस्टमुळे इमरान आणि तिचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र अनंतिका हिची पोस्ट व्हायरल होत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं नाही. अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान (Imran Khan) आणि अवंतिका मलिकशी (Avantika Malik) २०११ मध्ये लग्न केलं.
लग्नानंतर दोघांना एक मुलगी आहे. इमारा असं तिचं नाव आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं, पण लग्नानंतर दोघांचं नातं फार टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. इमरानचे विवाहबाह्य संबंध हे दोघांच्या विभक्त होण्यामागचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं होतं.
इम्रान खान याचे सिनेमे इम्रान खान याने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू… या जाने ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इम्रान २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी बट्टी’ सिनेमातून चाहत्यांच्य भेटीस आला. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर कधी दिसला नाही. इम्रान याने ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘देल्ही बेली’ सिनेमात कमालीची कामगिरी केली. त्यानंतर अभिनेत्याने आता स्वतःचा मोर्चा सिनेमा लेखण आणि दिग्दर्शनाच्या दिशेने वळवला आहे.