Imtiaz Jaleel on controversy of Aurangzeb tomb kabar: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेले अन्याय मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. ज्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. एवढंच नाहीतर, नागपुरात तर राडे झाले. आणि राज्यात अशांतता माजली. औरंगजेबाच्या कबरीवरून देखील अनेक राडे झालेय. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान एका कार्यक्रमात औरंजेबाला तुम्हीच जिंवत केलं… असं वक्तव्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यांनी केलं.
सरकारवर निशाणा साधत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले, ‘मागच्या 70 वर्षांमध्ये औरंगजेबाबद्दल लोकांनी जेवढं वाचलंय, तेवढं अनेकांना गेल्या एका महिन्यात वाचलं. औरंगजेबाला तुम्ही जिवंत केलं. आता मी पाण्याचा प्रश्न विचारणार नाही. माझ्या शहरात आजही आठ आठ दिवसांनंतर पाणी येत. रिपोर्टर आला त्याने मला विचारलं, ‘औरंगजेबाबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे?’ मी त्याला सांगितलं पाण्याचा प्रश्न सोडवा आधी… याबाबतीत कोणीच नाही विचारणार…संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली. जेव्हा ते पाणी मागत होते, तेव्हा ही क्रुरता नव्हती का…’ असं देखील जलील म्हणाले.
होळीच्या दिवशी गालबोट नाही लागलं म्हणून…
होळीच्या दिवशी जुम्मा की नमाज… मुसलमान बाहर निकलेगा आणि हिंदू होली खेलते रहेगा… अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती, की आता महाराष्ट्रात काय होणार… मुसलमान नमाज पठण करण्यासाठी निघणार आण एकीकडे हिंदू होळी खेळण्यासाठी…
तर त्या वेळी देखील मी सांगितलं होतं. मला माझ्या महाराष्ट्रावर विश्वास आहे. मुसलमान नमाज अदा करणार आणि माझे हिंदू बांधव होळी देखील त्याच दिवशी खेळणार… पण तेव्हा काही झालं नाही. कुठेही गालबोट नाही लागलं. मी आजही पोलिसांना सांगतो, जे कोणी कायद्याचे नियम पाळत नसतील, त्यांच्यावर कारवाई करा. पण कृपा करून एकतर्फी कारवाई करु नका… असं देखील इम्तियाज जलील म्हणाले.