Ind vs Ban : शुबमन गिलच्या हाफ सेंच्युरीवर सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया पाहून नेटकरी म्हणाले ‘रिश्ता पक्का’
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही भारत विरुद्ध बांगलादेश सामना पाहण्यासाठी पुण्यात आली होती. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याबाबत अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असतात. त्यामुळे स्टेडियमवर साराने दिलेली प्रतिक्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे.
पुणे | 20 ऑक्टोबर 2023 : वर्ल्डकप स्पर्धेत गुरुवारी टीम इंडियाने सलग चौथा विजय मिळवला. भारताने बांगलादेशवर सात गडी राखून मात केली. हा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसुद्धा स्टेडियमवर उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर साराच्या रिॲक्शनचीच जोरदार चर्चा आहे. कारण भारत विरुद्ध बांगलादेशच्या मॅचदरम्यान शुबमन गिलने 53 धावा करत हाफ सेंच्युरी केली. गिलच्या षटकारावर स्टेडियमवरील सर्व क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. मात्र त्याच्या या दमदार खेळीवर ज्या रिॲक्शनने सर्वांचं लक्ष वेधलं, ती साराची होती. शुबमनच्या जबरदस्त परफॉर्मन्सनंतर सारा स्टेडियमवर आनंदाने आणि उत्साहाने टाळ्यांचा कडकडाट करताना दिसली. साराचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘सचिन सर, तुमच्याकडून होकार आहे का’, असा गमतीशीर प्रश्न एकाने विचारला. तर ‘या क्षणाची प्रतीक्षा आम्ही कधीपासून करत होतो’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘रिश्ता पक्का हो गया’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. याआधी अनेकदा साराचं नाव शुबमन गिलशी जोडण्यात आलं. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. म्हणूनच साराच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
शुबमन गिलचं नाव केवळ सारा तेंडुलकर नव्हे तर अभिनेत्री सारा अली खानशीही जोडलं गेलं होतं. सारा आणि शुबमनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजही ‘सारा’ या नावानेच अनेकदा त्याची मस्करी केली जाते.
RISTHA PAKKA HOGAYA AUR CONFUSION BHI 🤣🤣 #ShubmanGill pic.twitter.com/6yM28Bt0nG
— VIRAT KOHLI 🌐 (@nelsonDROCKY1) October 19, 2023
Isi moment ka wait to sab log kar rahe the
— Ronak (@iamRonak45) October 19, 2023
दरम्यान टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 17 वा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा हा सलग चौथा विजय ठरला आहे. विजयासाठी मिळालेलं 257 धावांचं आव्हान टीम इंडियाने 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कॅप्टन रोहित शर्माने 48 धावा, शुबमन गिलने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यरने 19 धावांचं योगदान दिलं. तर केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवलं.