Shubhman Gill | सारा तेंडुलकर हिने नाही तर, ‘या’ सोशल मीडिया स्टारने शुभमनला सांगितलं खास ‘सिक्रेट’
सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअप, सारा तेंडुलकर हिच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना शुभमन गिलला सोशल मीडिया स्टारने सांगितलं खास 'सिक्रेट'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासोबत जोडण्यात येत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या ब्रेकअपची चर्चा देखील रंगली होती. पण शुभमनने यावर मौन बाळगलं आहे. सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअप, सारा तेंडुलकर हिच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना शुभमन गिल एका सोशल मीडिया स्टारसोबत गप्पा मारताना दिसत आहे. सध्या सर्वत्र शुभमन गिल आणि सोशल मीडिया स्टारची चर्चा रंगत आहे. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत…
नुकताच शुभमन गिल याला सोशल मीडिया स्टार निहारिका एनएम हिच्या अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसला. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निहारिका, शुभमनला विचारते, ‘तुला कोणता खेळ आवडतो…’ यावर शुभमन म्हणतो, ‘मी तर क्रिकेट खेळतो..’ पुढे शुभमन निहारिकाला विचारतो, ‘तुला सिनेमे पाहायला आवडतात…’
शुभमनच्या या प्रश्नावर उत्तर देत निहारिका म्हणते, ‘मला सुपरहीरो टाईप सिनेमे आवडतात….’ निहारिकाचं उत्तर ऐकल्यानंतर शुभमन म्हणतो, ‘मी स्पायडर मॅनचा भारतीय व्हर्जन आहे…’ यावर निहारिकाचं उत्तर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. निहारिका म्हणते, ‘मला तुला एक सिक्रेट सांगायचं आहे, आजपर्यंत हे मी कोणाला सांगितलं नाही, मी प्रियांका चोप्रा आहे…’
Idk if this was a date or a magic show. ? Catch @ShubmanGill as desi Spiderman in the Spider-Man: Across the Spider-Verse movie.#SpiderMan #SpiderVerse #ShubhmanGill pic.twitter.com/3mGt5BBwkP
— Niharika Nm (@JustNiharikaNm) June 4, 2023
क्रिकेटर शुभमन गिल आणि सोशल मीडिया स्टार निहारिका एनएम यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. शुभमन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शुभमन भारतीय क्रिकेट संघातील सर्वात महत्त्वाची क्रिकेटपटू आहे.
शुभमन मुलाखतींच्या माध्यमातून कायम त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असतो. काही दिवसांपूर्वी शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एका मुलाखतीमध्ये शुभमन याला आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शुभमन याने सारा अली खान हिचं नाव घेतलं. एवढंच नाही तर साराला डेट करत आहेस का? असा प्रश्न देखील क्रिकेटरला विचारण्यात आला. या प्रश्नावर शुभमन म्हणाला, ‘शायद हा शायद ना…’
सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगत असताना दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पण यामध्ये किती तथ्य आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.