विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विदेशात जगत आहेत खास आयुष्य, ‘ते’ फोटो व्हायरल, क्रिकेटरच्या हातामध्ये…
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे विदेशात खास वेळ घालवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे की, विराट आणि अनुष्का विदेशात शिफ्ट होणार आहेत. मात्र, त्यावर भाष्य करणे दोघांनीही टाळले आहेत. आता नुकताच हे दोघे स्पॉट झाले आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. विराट कोहली हा टी 20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसला. त्यानंतर टीमसोबत विराट भारतामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर लंडनला आपल्या कुटुंबाकडे परतला. सध्या विराट कोहली हा आपल्या कुटुंबासोबत खास वेळ लंडनमध्ये घालवताना दिसतोय. अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच अकायला लंडनमध्येच जन्म दिला. हेच नाही तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लंडनमध्येच स्थायिक होणार असल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय. अनुष्का शर्मा हिने रक्षाबंधनच्या दिवशी राखीचे खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.
विराट आणि अनुष्का शर्मा लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, त्यावर अजिबात भाष्य हे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून करण्यात नाही आले. अनुष्का शर्माने विराट कोहली हा लंडनमध्ये पोहोचल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यामध्ये नाश्त्याची प्लेट दिसत होती.
अनुष्का शर्मा आणि विराट लंडनमध्ये मुलांसोबत खास वेळ घालवत आहेत. आता नुकताच एक व्हिडीओ आणि काही फोटो हे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये ते दोघे लंडनमध्ये सामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्का रस्ता ओलांडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
अनुष्का शर्मा ही पुढे आहे तर तिच्या मागे विराट कोहली हा चालत आहे. विराट कोहली याच्या हातामध्ये अनेक शॉपिंग बॅंग दिसत आहेत. यावरून हे दिसत आहे की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लंडनमध्ये शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडले आहेत. आता अनुष्का आणि विराटचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही दिवसांपूर्वीच खुलासा केला की, त्यांना मुलगा झाला. हेच नाही तर मुलाचे नाव अकाय ठेवले हे देखील सांगण्यात आले. मात्र, मुलाची झलक अजूनही त्यांच्याकडून दाखवण्यात नाही आली. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा हिने मुलाच्या हाताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होतेा.