विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये स्थायिक?, अखेर ते फोटो व्हायरल, अभिनेत्री…
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. विराट कोहली आणि अनुष्का यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. विराट आणि अनुष्काची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा केली. अनुष्का आणि विराटच्या मुलाचे नाव अकाय आहे. T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना विराट कोहली हा दिसला. भारतीय संघासोबत भारतामध्ये परतल्यानंतर विराट कोहली हा लगेचच त्याच रात्री लंडनला अनुष्का शर्मा आणि आपल्या कुटुंबियांकडे रवाना झाला. विराट कोहली याचे एअरपोर्टवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनमध्येच शिफ्ट होणार आहेत, ते भारतामध्ये परतणार नाहीत. मुलांच्या खासगी आयुष्यासाठी ते लंडनमध्येच राहणार असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर अनुष्का शर्मा हिने लंडनमध्येच अकायला जन्म दिला, त्यानंतर ती फक्त एकदाच भारतात आली आणि लंडनला परत गेली.
सध्या विराट कोहली हा लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. सध्या सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे काही खास फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये विराट कोहली हा टी शर्ट आणि ब्राऊन शॉर्टसमध्ये दिसत आहे. अनुष्का शर्मा ही ब्लू फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे या फोटोमध्ये दोघेही एकदम जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहेत. दोघेही आनंदी दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने त्यांच्या नाश्त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यामध्ये अनेक हेल्दी पदार्थ दिसत होते.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे विदेशात शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा यांनी भाष्य केले नाहीये. अनुष्का शर्मा ही तशी चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनुष्का शर्माचा शेवटी 2018 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला, त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिली नाही.