चीनच्या शंघाई शहरात सुरू झाले भारतीय फिल्म फेस्टिवल, चीनकडून मैत्रिपूर्ण संबंध करण्याचा प्रयत्न!
एससीओचे सदस्य विविध संघटनांच्या माध्यमातून संघटनेची जागतिक भूमिका मजबूत करण्यात गुंतले आहेत.
मुंबई : एससीओचे सदस्य विविध संघटनांच्या माध्यमातून संघटनेची जागतिक भूमिका मजबूत करण्यात गुंतले आहेत. याचाच एक भाग म्हणजे भारतीय चित्रपटाची सीरीज चीनची राजधानी बीजिंग येथे सुरू झाली आहे. एससीओचे महासचिव व्लादिमिर नोरोव आणि चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिश्री यांनी शनिवारी संध्याकाळी भारतीय दूतावासामध्ये त्याचे उद्घाटन केले. (Indian Film Festival kicks off in Shanghai China)
चीनसह जगातील बर्याच देशांमध्ये गाजलेला चित्रपट ‘थ्री इडियट्स’ यावेळी पुन्हा दाखविला गेला. दूतावासाच्या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच टाळ्यांचा गडगडाट केला. या महोत्सवात पुढच्या वर्षी ‘बर्फी’, ‘तारे जमीन पर’, ‘रॉकस्टार’, ‘ब्लॅक’ आणि ‘माय नेम इज खान’ असे सुपरहिट हिंदी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
दूतावास रशियन भाषेत डब केलेल्या दोन डझनहून अधिक भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करणार आहे, जे जवळजवळ प्रत्येक महिन्यात प्रदर्शित केले जातील. 2023पर्यंत भारत एससीओ कौन्सिलचे प्रमुख होईपर्यंत चित्रपटांची ही मालिका सुरू राहील. या प्रसंगी एससीओचे सरचिटणीस व्लादिमीर नोरव म्हणाले की, पुढच्या वर्षी एससीओ स्थापनेला 20 वर्षे पूर्ण होत असल्याने सिनेमास्कोप हा कार्यक्रम 2021मध्ये साजरा करण्यात येणाऱ्या एससीओ संस्कृती वर्षानुसार असेल. नोरोव पुढे म्हणाले की, भारतीय चित्रपटांचा, विशेषत: बॉलिवूडचा प्रभाव सर्वत्र आहे. याचबरोबर 2013मध्ये भारतीय चित्रपटांना 100 पूर्ण झाले आहेत. गेल्या शंभर वर्षांमध्ये, भारतीय चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटपासून आता रंगीत झालं आहे. ज्यामध्ये गाणे आणि नृत्यदेखील समविष्ट आहेत. यामधून समाजाला भक्कम संदेश मिळतो. या काळात भारतीय चित्रपटसृष्टीने विविध देशांच्या सीमा देखील ओलांडल्या आहेत आणि आता हे चित्रपट केवळ करमणूक म्हणून पाहिले जात नाहीत तर, लोकांना जोडण्याचे एक शक्तिशाली माध्यमही बनले आहेत.
एससीओचे महासचिव पुढे म्हणाले की, रूसी भाषेत डब केलेल्या भारतीय चित्रपटांचा चित्रपटप्रेमींवर सकारात्मक परिणाम झाला आहे. सोवियत युनियनमध्ये दाखवल्या जाणार्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक, ‘आवारा’ पाहून आपल्यापैकी बरेच जण मोठे झाले आहेत. राज कपूर, मिथुन चक्रवर्ती ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक भारतीय अभिनेते आणि अभिनेत्री रूसमधील घरांमध्ये आशावादाचे प्रतीक मानल्या जातात. त्यावेळी राजदूत मिस्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेल्या फिल्म फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाबद्दल एससीओचे सदस्य देश विचार करीत आहेत, तर दूतावासानं सिनेमातून या देशांमधील संबंध सुधारण्यासाठी एक छोटीशी सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे एससीओ काऊन्सिलच्या प्रमुखांच्या 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीचे यशस्वी आयोजन आणि एससीओ कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी एक नवीन ट्रॅक सुरू करण्याचा हा एक मार्ग आहे. चीन, रूस, भारत आणि पाकिस्तानसह 8 देश एससीओचे सदस्य आहेत. तर अनेक परदेशी देश एससीओच्या बैठकीत भाग घेतात. संघटनेचे मुख्यालय शंघाई, चीन येथे आहे, जे वर्ष 2001 मध्ये स्थापन झाले आहे.
संबंधित बातम्या :
नीतू कपूरनंतर वरुण धवनने केली कोरोनावर मात, लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार!
(Indian Film Festival kicks off in Shanghai China)