Indian Idol 12 | आदित्य नारायणनंतर मनोज मुंतशिरांचा अमित कुमारवर निशाणा, म्हणाले…

सध्या छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) खूप चर्चेत आहे. टीआरपीमध्येही हा शो अप्रतिम कामगिरी करत आहे. पण दुसरीकडे हा कार्यक्रम सतत वादाच्या भोवऱ्यातही अडकत आहे. अमित कुमार यांच्याकडून शोवर लावण्यात आलेल्या आरोपानंतर नवनवे वाद सातत्याने पुढे येत आहेत.

Indian Idol 12 | आदित्य नारायणनंतर मनोज मुंतशिरांचा अमित कुमारवर निशाणा, म्हणाले...
मनोज मुंतशिर
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 10:51 AM

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) खूप चर्चेत आहे. टीआरपीमध्येही हा शो अप्रतिम कामगिरी करत आहे. पण दुसरीकडे हा कार्यक्रम सतत वादाच्या भोवऱ्यातही अडकत आहे. अमित कुमार यांच्याकडून शोवर लावण्यात आलेल्या आरोपानंतर नवनवे वाद सातत्याने पुढे येत आहेत. या सगळ्यात आता मनोज मुंतशिर (Manoj Muntashir ) यांचे विधान चर्चेत आले आहे (Indian Idol 12 Writer and judge Manoj Muntashir criticized amit kumar after controversy).

या वेळी इंडियन आयडॉलमध्ये लेखक मनोज मुंतशिर बर्‍याच वेळा परीक्षक म्हणून दिसले आहेत. अशा परिस्थितीत ते स्वत: देखील एकेकाळी चुकीची माहिती देऊन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पण आता मनोज स्वत: शोच्या बाजूने पुढे आले असून, त्यांनीदेखील अमित कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमित कुमारांवर टीका करत म्हणाले…

अमित कुमार यांनी शोवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनोज मुंतशिर सहमत नाहीत. एका प्रसिद्ध वेबसाईटच्या बातमीनुसार, मनोजने अमित कुमार यांच्यावर टीका केली आणि सांगितले की, जर तुम्ही कुतुक करण्याचे पैसे घेतले होते, मग या शोवर टीका का केलीत?

त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जर असे काही असते तर अमितने शोसाठी संमती दिली नसती. या शोचा भाग होण्यासाठी त्यांनी पैसे घेतले आणि त्यानंतर शोवरच टीका केली. अमित कुमारने जे केले, ते मी केले नाही. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी अमित कुमारच्या जागी असतो तर हे काम करण्यास मला आनंद झाला नसता, मी थेट निर्मात्यांना सांगितले असते की, एक दिखावा म्हणून मला या कार्यक्रमाचा भाग व्हायचे नाही (Indian Idol 12 Writer and judge Manoj Muntashir criticized amit kumar after controversy).

इतकेच नाही तर मनोज नेहा (Neha Kakkar) आणि हिमेशच्या बचावामध्ये बोलतानाही दिसले. नेहा आणि हिमेशने जे काही गायले ते, अमित कुमारांना पटवून देण्यासाठी नाही, तर पूर्ण भावनांनी गायले गेले होते आणि ते त्यांनी देखील योग्य प्रकारे घेतले पाहिजे होते, असे ते म्हणाले आहेत. यापूर्वी आदित्य नारायणने शोमध्येच अमित कुमार यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली होती. जेव्हा शोमध्ये कुमार सानू, अनुराधा पौडवाल पाहुणे म्हणून आले होते, तेव्हा आदित्यने विचारले होते की, आम्ही तुम्हाला जबरदस्ती स्पर्धकांचे कौतुक तर करायला नाही लावले ना? यानंतर आदित्यवरही खूप टीका झाली होती.

अमित कुमार यांचा आरोप

जेव्हा अमित कुमार पाहुणे म्हणून शोमध्ये पोहोचले होते तेव्हापासून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. या कार्यक्रमात त्यांनी स्पर्धकांचे कौतुक केले. मात्र, बाहेर आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले. अमित कुमार म्हणाले की, स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी आपल्याला पैसे देण्यात आले होते. त्यांना परीक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गायलेली किशोर कुमार यांची गाणी आवडली नाहीत आणि ते अपमानास्पद देखील वाटले. अमित कुमार यांनी शोवर आणखी बरेच आरोप केले. ज्यानंतर हा कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आला आहे.

(Indian Idol 12 Writer and judge Manoj Muntashir criticized amit kumar after controversy)

हेही वाचा :

Amitabh Bachchan | ‘अब तक 52’, खास पोस्ट शेअर करत ‘बिग बीं’नी दिला बॉलिवूडमधील 52 वर्षाच्या कारकिर्दीला उजाळा!

कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.