Indian Idol 13 जिंकण्याआधीच चमकलं नशीब; स्पर्धकाला मिळणार एकता कपूरच्या मालिकेची ऑफर?

'इंडियन आयडॉल 13'मधील स्पर्धकांच्या सौंदर्यावर सगळेच फिदा! एकता कपूर देणार मोठी संधी? खुद्द जितेंद्र यांनी केली प्रशंसा

Indian Idol 13 जिंकण्याआधीच चमकलं नशीब; स्पर्धकाला मिळणार एकता कपूरच्या मालिकेची ऑफर?
'इंडियन आयडॉल 13'मधील स्पर्धकांच्या सौंदर्यावर सगळेच फिदा! Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 1:49 PM

मुंबई: ‘इंडियन आयडॉल 13’ या गायनाच्या रिअॅलिटी शोमध्ये एक असा चेहरा आहे, जो ग्रँड फिनालेच्या आधीच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रकाशझोतात आला आहे. या शोमध्ये जो कोणी सेलिब्रिटी पाहुणा म्हणून हजेरी लावतो, तो तिच्या सौंदर्याची प्रशंसा करतोय. इतकंच नव्हे तर काहींनी तिला अभिनयात करिअर करण्याचाही सल्ला दिला आहे. जिच्या सौंदर्याची एवढी प्रशंसा होतेय, त्या स्पर्धकाचं नाव आहे बिदिप्ता चक्रवर्ती. बिदिप्ताच्या गायकीसोबतच तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

जितेंद्र यांनीही केली सौंदर्याची प्रशंसा

बिदिप्ताला इंडियन आयडॉलच्या शोमधील सर्वांत सुंदर स्पर्धक असल्याचं म्हटलं जात आहे. बिदिप्ताला फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी ‘हिरोइन मटेरियल’ म्हटलं आहे. म्हणजेच अभिनेत्री म्हणून ती इंडस्ट्रीत काम करू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. रविवारच्या एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी हजेरी लावली होती. तेव्हा जितेंद्र हे बिदिप्ताच्या गायकीसोबतच तिच्या सौंदर्याचेही चाहते झाले.

बिदिप्ता अभिनेत्री बनू शकते, असं ते या शोमध्ये म्हणाले. “तू खूप सुंदर आहेस. अभिनेत्री बनण्याची क्षमता तुझ्यात आहे. तुला चित्रपटात काम करायला पाहिजे. मी अनेक नवोदित कलाकारांसोबत काम केलंय. माझ्या अनुभवावरून मी हे नक्कीच सांगू शकतो की तू यशस्वी होशील. एकता तर इथे आहेच, प्रॉडक्शन कंपनीसुद्धा आपलीच आहे, तू नक्कीच प्रयत्न केले पाहिजे”, असं जितेंद्र म्हणाले.

एकता कपूर देणार मोठी संधी?

जितेंद्र यांनी शोमध्ये एवढं मोठं वक्तव्य केल्यानंतर आता खरंच त्यांची मुलगी आणि निर्माती एकता कपूर बिदिप्ताला संधी देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याआधी बिदिप्ताला सुभाष घई, सूरज बडजात्या यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांनीही अभिनयविश्वात पदार्पण करण्याचा सल्ला दिला.

इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकण्याआधीच बिदिप्ता स्टार बनली आहे, हे नक्की. 24 वर्षीय बिदिप्ताचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.