India’s Best Dancer 2 Finale : इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा आज अल्टिमेट फिनाले; मिका सिंग, शिल्पा शेट्टी, धर्मेश खास पाहुणे, रंगत चढणार

9 जानेवारी रोजी इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा फिनाले आहे. रात्री आठ वाजल्यापासून सोनी टीव्हीवर तो प्रदर्शित केला जाईल. या अल्टिमेट फिनालेमध्ये मिका सिंग, शिल्पा शेट्टी तसेच धर्मेशसह खास पाहुणे विशेष आकर्षण असतील.

India’s Best Dancer 2 Finale : इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा आज अल्टिमेट फिनाले; मिका सिंग, शिल्पा शेट्टी, धर्मेश खास पाहुणे, रंगत चढणार
INDIA'S BEST DANCER SEASON 2
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 8:06 AM

India’s Best Dancer 2 Ultimate Finale : सोनी टीव्ही (Sony Tv) वरील प्रसिद्ध असा इंडियाज़ बेस्ट डांसर 2’ हा रिअॅलिटी शो आपल्या अंतिम टप्यात पोहोचला आहे. आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा फिनाले आहे. रात्री आठ वाजल्यापासून सोनी टीव्हीवर तो प्रदर्शित केला जाईल. या अल्टिमेट फिनालेमध्ये मिका सिंग, शिल्पा शेट्टी तसेच धर्मेशसह खास पाहुणे विशेष आकर्षण असतील.

शिल्पा शेट्टी कुंद्रा, बादशाह, मनोज मुंतशिर राहणार खास पाहुणे 

आयबीडीचा दुसरा सीझन आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या सीझनमधील टॉप पाच फायनलिस्ट यांच्यात आज मुकाबला होईल. या पाचही स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे कोरिओग्राफर्स आज उपस्थित असणार आहेत. तसेच कोरिओग्राफर्स व्यतिरिक्त आजच्या अल्टिमेट फिनालेमध्ये इंडियाज गॉट टॅलेंटचे जज शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra), बादशाह (Badshah) आणि मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) हे खास पाहुणे म्हणून धम्माल उडवणार आहेत.

अल्टिमेट फिनालेमध्ये मनोरंजनाचा तडका

यावेळी इंडियाज बेस्ट डान्सरच्या फिनालेमध्ये इंडियाज गॉट टॅलेन्ट या रिअॅलिटी शोमधील जजसोबत प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग तसेच मास्टर ऑफ डान्स अशी ओळख असलेला कोरिओग्राफर धर्मेश येलांडे हेदेखील पाहुणे म्हणून सामील होती. यांच्या उपस्थितीमुळे आज एबीडीच्या फिनालेला चार चांद लागणार आहेत. या सर्वांसोबतच या शोचे जजेस मलायका अरोरा, टेरेन्स लुईस, गीता कपूर हे प्रसिद्ध चेहरे आजच्या फिनालेमध्ये धम्माल उडवून देणार आहेत.

पाहुणे आपल्या आवडत्या डान्सरला चिअरअप करणार

आयबीडी सीझन 2 च्या अल्टिमेट फिनालेमध्ये पाच डान्सर्समध्ये सामना होणार आहे. रोज़ा राणा (Roza Rana), रक्तिम ठाकुरिया (Raktim Thakuriya), ज़मरूद (Zamroodh), गौरव सरवन (Gaurav Sarvan) आणि सौम्या कांबळे (Soumya Kamble) हे पाच बेस्ट डान्सर्स आयबीडी सीझन 2 ची ट्रॉफी खिशात खालण्यासाठी जीवाची बाजी लावणार आहेत. तर दुसरीकडे फिनालेसाठी आलेले पाहुणे आपापल्या आवडत्या डान्सरला प्रोत्साहन देताना दिसणार आहेत.

सीझन टू फिनाले ठरणार विशेष 

दरम्यान, इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 चा द अल्टिमेट फिनाले आज रात्री आठ वाजता सोनी टीव्हीवर दाखवला जाईल. हा फिनाले मागील सीझनपेक्षा विशेष ठरणार आहे. कारण पाचही स्पर्धक एकमेकांना चांगलेच आव्हान देणारे आहेत. तसेच आजच्या फिनालेमध्ये काही डान्स परफॉर्मन्स मनाला खिळवून ठेवणारे आहेत. त्यामुळे आजच्या या फिनालेमध्ये आयबीडी सीझन 2 ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ शुक्रवारी चित्रपटगृहांत! पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलरने वाढवली उत्सुकता…

Pushpa The Rise | ’83’ला ओव्हरटेक करत पुष्पाच्या हिंदी वर्जनचा धुमाकूळ, तब्बल 73 कोटीची कमाई

जॅकलिन, सुकेशचा फोटो पुन्हा व्हायरल, चर्चेला उधान; कोण आहे मनी लाँडरिंग प्रकरणात आरोप झालेला सुकेश चंद्रशेखर?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.