Reels | इन्स्टाग्राम रिल्समुळे मिळाली मोठी संधी; काही सेकंदांच्या व्हिडीओमुळे बदललं डान्सरचं आयुष्य

इंडियाज बेस्ट डान्सरचा तिसरा सिझन सध्या सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. या शोमध्ये कोरिओग्राफर गीता कपूर, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि टेरेन्स लुईस हे परीक्षक आहेत. या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा परीक्षक होती.

Reels | इन्स्टाग्राम रिल्समुळे मिळाली मोठी संधी; काही सेकंदांच्या व्हिडीओमुळे बदललं डान्सरचं आयुष्य
India’s Best Dancer 3Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 9:28 AM

मुंबई : सध्या इन्स्टाग्राम रिल्सचा जमाना आहे. या रिल्समध्ये असंख्य नेटकरी त्यांची प्रतिभा सादर करताना दिसतात. डान्स, गायन, पाककला, अभिनय कौशल्य दाखवणारे बरेच रिल्स सोशल मीडियावर ट्रेंड्स होत असतात. अनेकदा याच रिल्समध्ये काहींचं नशीब चमकतं. असंच काहीसं शिवांशु सोनीसोबत घडलंय. सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चं तिसरं पर्व सुरू झालं आहे. या शोच्या ऑडिशन्सदरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक डान्सर्सनी परीक्षकांसमोर परफॉर्मन्स सादर केले. काही डान्सर्सनी आपल्या दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांसोबतच परीक्षकांचीही मनं जिंकली.

या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये शिवांशु सोनीने त्याच्या प्रतिभेनं परीक्षक टेरेन्स लुईसला प्रभावित केलं. टेरेन्सने खुद्द शिवांशुकडून डान्स शिकण्याची इच्छा व्यक्त केली. ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’च्या ऑडिशन्सदरम्यान मध्यप्रदेशच्या शिवांशु सोनीने स्टेजवर आपला डान्स सादर केला. शिवांशुचा डान्स पाहिल्यानंतर शोमधील परीक्षक टेरेन्स लुईसने स्वत: त्याच्याकडून डान्स शिकण्याविषयी उत्सुकता व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

शिवांशुचा ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या ऑडिशन्सपर्यंतचा प्रवास फारच रंजक आहे. सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ पाहून टेरेन्सने त्याला ऑडिशन्ससाठी आमंत्रित केलं. शिवांशुसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं, ‘मी शिवांशुला इन्स्टाग्रामवर शोधून त्याच्याकडे डान्स शिकण्याची विनंती केली होती. त्यानंतर आम्ही एकत्र इन्स्टाग्राम रिलसुद्धा शूट केला.’

शिवांशुने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटातील ‘बिनते दिल’ गाण्यावर परफॉर्म केलं होतं. शिवांशुला त्याच्या कुटुंबीयांकडून पूर्ण पाठिंबा मिळाला. याविषयी बोलताना तो म्हणाला, “डान्स माझं आयुष्य आहे. माझ्या कुटुंबातील कोणीच या क्षेत्रातील नाही. माझी आई राजकारणी आहे आणि बहीण वकील आहे. त्यांनी मला माझ्या डान्सिंग करिअरसाठी साथ दिली.”

पहा व्हिडीओ

इंडियाज बेस्ट डान्सरचा तिसरा सिझन सध्या सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. या शोमध्ये कोरिओग्राफर गीता कपूर, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि टेरेन्स लुईस हे परीक्षक आहेत. या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा परीक्षक होती. मात्र आता तिची जागा या सिझनमध्ये सोनाली बेंद्रेने घेतली आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.