मलायकाचा रेमोसोबत जमिनीवर लोळून डान्स; चिडलेली गीता माँ म्हणाली “हे अती होतंय..”

अभिनेत्री मलायका अरोरा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मलायका 'गर्मी' या गाण्यावर रेमोसोबत हॉट अंदाजात डान्स करताना दिसून येत आहे.

मलायकाचा रेमोसोबत जमिनीवर लोळून डान्स; चिडलेली गीता माँ म्हणाली हे अती होतंय..
मलायका अरोरा, गीता कपूर, रेमो डिसूझाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 11:36 AM

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी, फॅशनसाठी आणि डान्ससाठी विशेष ओळखली जाते. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मलायका अत्यंत फिट राहण्यावर भर देते. इतकंच काय तर या वयात ती डान्सच्याही बाबतीत भल्याभल्या तरुण अभिनेत्रींना मात देते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कोरिओग्राफर रेमो डिसूझासोबत डान्स करताना दिसून येत आहे. मलायकाचा हा डान्स व्हिडीओ ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’ या शोमधील आहे. यामध्ये तिने लाल रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केल्याचं पहायला मिळतंय. रेमो आणि मलायका हे नोरा फतेहीच्या ‘हाय गर्मी’ या गाण्यावर डान्स करतात. मात्र या दोघांचा सिझलिंग डान्स पाहून कोरिओग्राफर गीता कपूर ऊर्फ गीता माँ चांगलीच भडकली आहे.

रेमो आणि मलायकाचा हॉट डान्स या व्हिडीओत पहायला मिळतोय. ‘हाय गर्मी’ या गाण्यावर मलायका नोराची हुक स्टेप करताना दिसते. अगदी जमिनीवर लोळून मलायका ही स्टेप करते. दोघांचा हा डान्स पाहून गीता चिडते आणि म्हणते, “आता हे अति होतंय. माझ्या मनाला हे खूप लागलंय. या मस्करीचं उत्तर आता गंभीरपणे देणार.” त्यानंतर मलायका आणि रेमो दोघांच्या चेहऱ्यावर बारा वाजल्याचे भाव दिसून येतात. यापुढे काय घडणार, हे शोच्या एपिसोडमध्येच पहायला मिळेल. मात्र मलायका आणि रेमोच्या या डान्सने नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलंय.

हे सुद्धा वाचा

मलायका गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अभिनेता अर्जुन कपूरसोबत तिने ब्रेकअप केलंय. त्यानंतर एका रेस्टॉरंटबाहेर तिला एका मिस्ट्री मॅनसोबत पाहिलं गेलं. मलायका त्याच्या हातात हात घालून चालत होती. त्यामुळे मलायका या व्यक्तीलाच डेट करतेय की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तो मलायकाचा मित्र किंवा प्रोफेशनल पार्टनर असू शकतो, असाही अंदाज काहींनी वर्तवला होता.

मलायकाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने तिचं रिलेशनशिप स्टेटस सांगितलं होतं. ‘माझं आताचं स्टेटस..’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं आणि त्याखाली तीन पर्याय होते. रिलेशनशिपमध्ये, सिंगल आणि हेहेहेहे (हसणं) असे तीन पर्याय त्याखाली देण्यात आले होते. यापैकी मलायकाने ‘हेहेहेहे’ या पर्यायावर बरोबरची खूण केली होती. दुसरीकडे ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठीच्या एका कार्यक्रमात अर्जुन म्हणाला, “आता सिंगल आहे मी, रिलॅक्स.”

सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.