सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची चौकशी झाली (Inquiry of Aditya Chopra in Sushant Singh Suicide Case).

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकशी
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 2:11 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची आज चौकशी करण्यात आली (Inquiry of Aditya Chopra in Sushant Singh Suicide Case). आदित्य चोप्रा यांची जवळपास 3 तास चौकशी झाली. यात सुशांत सिंहसोबत यशराज फिल्मसोबत केलेल्या करारांची आणि इतर व्यवहारांची माहिती घेण्यात आली. याशिवाय यशराज फिल्म्सवर झालेल्या आरोपांबाबतही विचारणा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुशांत सिंह राजपूतचा आदित्य चोपडा यांच्या यशराज फिल्म्ससोबत चित्रपट निर्मितीबाबत करार झाला होता. या करारानुसार यशराज फिल्म्स सुशांतला घेऊन 3 चित्रपट बनवणार होते. यापैकी 2 चित्रपटांची निर्मितीही झाली. मात्र, तिसरा चित्रपट बनलाच नाही. यानंतर सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केली. मात्र, या नैराश्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई पोलीस याच कारणांची तपासणी करत आहेत. त्यासाठीच सुशांतच्या संबंधातील सर्वांचीच चौकशी केली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर यशराज फिल्म्सवर एकिकडे सुशांततसोबत चित्रपट न करणं आणि दुसऱ्या बाजूला त्याला इतर चित्रपटातही काम मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळेच सुशांत डिप्रेशनमध्ये गेल्याचाही दावा करण्यात आला होता. याच आरोपांचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यासाठी आज (18 जुलै) आदित्य चोप्रा यांची चौकसी करण्यात आली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajpoot Suicide Case Investigation) पोलिसांचा उलटा तपासही सुरु झाला आहे. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्या दिवशी पोलिसांनी सुशांतचे वडील आणि इतर नातेवाईक यांना कुणावर संशय आहे का, असं विचारलं होतं. त्यांचा जबाब नोंदवला होता. मात्र, आता एक महिन्यानंतर पुन्हा पोलिसांनी सुशांतच्या नातेवाईकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल

Sushant Singh Rajpoot Suicide | सुशांतच्या आत्महत्येबाबत पोलिसांचा उलटा तपास, सुशांतच्या बहिणीला पुन्हा जबाबासाठी बोलावले

Ankita Lokhande | सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण, अंकिता लोखंडेची इंस्टाग्राम पोस्ट

Inquiry of Aditya Chopra in Sushant Singh Suicide Case

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.