मीरा राजपूत हिच्यासोबत आलिशाल घरात राहतो शाहिद कपूर ; पाहा INSIDE फोटो
शाहिद कपूरच्या आलिशान घराची एक झलक; स्वयंपाक घर देखील प्रचंड भव्य
Shahid Kapoor House Photos : अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो. शाहिदचे पत्नी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. आता मीरा आणि शाहिदच्या आलिशान घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत शाहिद मुंबईतील आलिशान घरात राहतो. शाहिद – मीरा यांच्या घराची किंमत जवळपास ५८ कोटी रुपये आहे. शाहिदचं हे स्वप्नातील घर सि-फेसिंग आहे. शाहिदचं मुंबईतील घर आलिशान असून महागड्या वस्तूंनी सजवण्यात आलं आहे. शाहिद – मीराच्या घराचे फोटो सर्वांचं लक्ष लेधून घेत आहे.
शाहिद – मीरा यांच्या घरी पायाचा स्टॅच्यू आहे. पायाचा स्टॅच्यूसोबत पोज देताना दोघांनी फोटो क्लिक केले आहेत. एवढंच नाही, तर अभिनेत्यांच्या घरातून बाहेरचा नयनरम्य नजारा दिसतो. दोघे कायम घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मीरा – शाहिदचं मुंबईतील घर प्रचंड सुंदर आहे.
काही फोटोंमध्ये मीरा सोफ्यावर बसून फोटो काढताना दिसत आहे. मीरा इन्स्टाग्रामवर देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. मीरा अभिनेत्री नसली तरी, तिचं सौंदर्य प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे फिकं आहे. मीरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
मीरा कायम तिच्या इन्स्टाग्रामवर घराचे फोटो शेअर करत असते. शाहिद आणि मीरा यांच्या घरातील स्वयंपाक घर देखील भव्य आहे. फोटोमध्ये मीरा स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना दिसत आहे.
मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सिनेमा विश्वासोबत थेट संबंध नसतानाही शाहिदच्या आयुष्यात आलेल्या मीरानं त्याच्या विश्वात एक कायमस्वरूपी आणि भक्कम असं स्थान तयार केलं. कुटुंबाच्या सहमतीने शाहिद आणि मीराने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
आता अनेक ठिकाणी शाहिद पत्नी मीरासोबत हजेरी लावतो. एवढंच नाही, तर अभिनेता कायम पत्नीची काळजी घेताना दिसतो. मीरा आणि शाहिद कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. दोघे दिसले, की फोटोग्राफर्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज असतात.