लुधियाना : इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत लाखो नेटकरी इन्फ्लुएन्सर बनतात. या इन्फ्लुएन्सर्सच्या फॉलोअर्सचा आकडाही खूप मोठा असतो. मात्र अनेकदा या प्लॅटफॉर्मचा दुरूपयोगही केला जातो. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. मोहालीची इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर जसनीत कौरला पोलिसांनी अटक केली आहे. लोकांना न्यूड फोटो पाठवून त्यांच्याशी ती चॅट करण्याचा प्रयत्न करायची. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. मोठमोठ्या बिझनेसमन्सला तिने आपल्या जाळ्यात फसवलं होतं. पोलिसांच्या अटकेनंतर जसनीतविषयी बरेच धक्कादायक खुलासे झाले आहेत.
जसनीत कौरचं तिच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट आहे आणि या अकाऊंटवर ती सेमी न्यूड फोटो, इन्स्टा रिल्स पोस्ट करते. फक्त इन्स्टाग्रामवरच नाही तर टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तिचे अकाऊंट आहेत. स्वत:ला इन्स्टाग्राम मॉडेल म्हणणारी जसनीत लोकांना पर्सनल मेसेज करून त्यांना न्यूड फोटो पाठवायची. मग काही दिवसांनंतर ती त्यांना ब्लॅकमेल करायची. अशा पद्धतीने श्रीमंत फॉलोअर्सकडून ती पैसे उकळायची. एका बिझनेसमनने तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.
लुधियाना पोलिसांनी 1 एप्रिल रोजी जसनीतला अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी एक BMW कार आणि महागडा फोन जप्त केला आहे. मोहालीच्या जसनीतचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती स्वत:ला अभिनेत्री आणि मॉडेल म्हणते. सप्टेंबर 2022 मध्ये तिने गुरबीर नावाच्या एका व्यावसायिकाकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर प्रायव्हेट चॅट लीक करेन, अशी धमकी तिने गुरबीरला दिली होती.
इतकंच नव्हे तर धमकी देण्यासाठी जसनीत काही गँगस्टर्सचीही मदत घ्यायची. तिच्याविरोधात 2008 मध्येही खटला दाखल होता. अटकेनंतर जसनीतच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. दोन दिवसांच्या कोठडीनंतर बुधवारी पोलिसांनी तिला कोर्टात सादर केलं. यावेळी कोर्टाने तिची कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवली. आता पोलीस जसनीतच्या अकाऊंटचा तपास करणार आहे. तिने आणखी कोणाकोणाला संपर्क केला होता, याचा तपास ते इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे करणार आहेत.
जसनीत कौरचं युथ काँग्रेस नेता लक्की संधू याच्याशी काय कनेक्शन आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत. लक्की संधूचे कॉल डिटेल्स पोलीस तपासत आहेत. तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.