Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aarey Metro Car Shed: ‘नुसतं हातात फलक घेऊन, झाडांना मिठी मारून प्रेम दाखवण्याऐवजी..’; आरेतील कारशेडला विरोध करणाऱ्यांसाठी सुमीत राघवनचं मार्मिक ट्विट

एकीकडे मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. तर दुसरीकडे मेट्रो-3 चं (Metro Carshed) रखडलेलं काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे.

Aarey Metro Car Shed: 'नुसतं हातात फलक घेऊन, झाडांना मिठी मारून प्रेम दाखवण्याऐवजी..'; आरेतील कारशेडला विरोध करणाऱ्यांसाठी सुमीत राघवनचं मार्मिक ट्विट
Sumeet RaghvanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:57 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो-3’चं कारशेड आरेतच (Aarey) उभारण्याची घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच पुन्हा एकदा हा प्रश्न पेटला. एकीकडे मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. तर दुसरीकडे मेट्रो-3 चं (Metro Carshed) रखडलेलं काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे. यात अभिनेता सुमीत राघवनचाही (Sumeet Raghvan) समावेश आहे. आरेतील मेट्रोच्या कारशेडबाबत सुमीतने वेळोवेळी ट्विट केले आहेत. आता नुकत्याच केलेल्या काही ट्विट्समध्ये त्याने आरेतील मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अत्यंत मार्मिक सल्ला दिला आहे.

काय म्हणाला सुमीत राघवन?

‘हे सत्य जाणून घ्या.. कारशेड समर्थकदेखील पर्यावरणाच्या विरोधात नाहीत. पण जागं होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आणि तुमच्या पिढीला अनुकूल अशी ‘तथ्ये’ सांगून खोटी कथा पसरवू नका. #कारशेडवहीबनेगा. अधिक माहितीसाठी SGNP (संजय गांधी नॅशनल पार्क) इथल्या संजय कांबळे यांना भेटा. आंदोलकांनी नुसतं फलक घेऊन उभं राहून आणि झाडांना मिठी मारून त्यांचं प्रेम दाखवण्याऐवजी त्यांना त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून काहीतरी उपयुक्त करायला सांगा. समाजाचं तसंच या प्राण्यांचं भलं करा. योगदान देऊन महाराष्ट्र सरकारचा भार थोडा हलका करा. बरोबर ना? रणजीत, मला खात्री आहे की तुम्हाला माहित असेल की SGNP मध्ये एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही पिंजऱ्यातील प्राण्याला एका वर्षासाठी दत्तक घेऊ शकता आणि त्याच्या/तिच्या अन्न आणि वैद्यकीय खर्चासाठी पैसे देऊ शकता. मी तारा (2018) आणि आतिश (2019) (बिबट्याची पिल्लं) यांना दत्तक घेतलं होतं. जर तुम्ही याबद्दल जनजागृती करू शकलात तर मला खूप आवडेल,’ असं ट्विट सुमीतने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

आरेतील मेट्रो कारशेडचा वाद

बहुचर्चित कुलाबा- वांद्रे – सिप्झ मेट्रो- 3चं कारशेड आरे कॉलनीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो- 3चं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचं 25 टक्के कामही पूर्ण झालं होतं. मात्र, नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचं नुकसान होणार असल्याचं सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग इथं करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.