‘या’ 5 वेब सिरीजमुळे भारतीय मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला

भारतीयांना वेबसिरीज बघायची सर्वात जास्त सवय कोणी लावली असेल तर त्याचे श्रेय टीव्हीएफ या ओटीटी प्लॅटफॉर्मला जाते. | Indian Web series and OTT platforms)

'या' 5 वेब सिरीजमुळे भारतीय मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 12:56 PM

मुंबई: सध्याच्या युगात विशेषत: कोरोना नंतरच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीज हा लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन यासारखी ओटीटी अ‍ॅप्लिकेशन्स तर अनेकांसाठी मुलभूत गरज झाली आहे. अनेक प्रेक्षक आता चित्रपटांऐवजी वेबसिरीज बघण्याचा प्राधान्य देताना दिसत आहेत. (Indian Web series and OTT platforms)

मात्र, हा बदल काही एका रात्रीत घडलेला नाही. 2010 पासून भारतात खऱ्या अर्थाने वेबसिरीज तयार व्हायला सुरुवात झाली. भारतीयांना वेबसिरीज बघायची सर्वात जास्त सवय कोणी लावली असेल तर त्याचे श्रेय टीव्हीएफ या ओटीटी प्लॅटफॉर्मला जाते. टीव्हीएफची ‘पिचर्स’ ही वेबसिरीज आजही अनेकांच्या स्मरणात असेल. चार तरुणांचा स्टाटअर्प सुरु करतानाचा संघर्ष आणि या सगळ्यावर विनोदी पद्धतीने करण्यात आलेले भाष्य प्रेक्षकांना भलतेच आवडले होते. आजही IMDb च्या लिस्टमध्ये टीव्हीएफच्या ‘पिचर्स’चा समावेश आघाडीच्या वेबसिरीजमध्ये आहे.

त्यानंतर टीव्हीएफने अनेक दर्जेदार वेबसिरीज तयार केल्या. परंतु, याच काळात इतर भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मसकडून तितक्याशा दर्जेदार वेबसिरीज तयार होत नव्हत्या. साधारण 2015च्या सुमारास Sony Liv कडून लव्ह बाईटस ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली होती. त्यावेळी ही वेबसिरीज फार लोकप्रिय ठरली नसली तरी तिची चर्चा झाली होती.

याशिवाय, 2010 मध्ये आलेली प्रतिक अरोराची कंपनी बहादूर ही वेबसिरीजही चर्चेचा विषय ठरली होती. या वेबसिरीजच्या प्रत्येक एपिसोडसाठी केवळ 5000 रुपयांचा खर्च आला होता. ‘द ऑफिस’ या गाजलेल्या टीव्ही मालिकेपासून प्रेरणा घेऊन ही वेबसिरीज तयार करण्यात आली होती.

याच काळात टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळख असलेल्या एकता कपूरनेही वेबसिरीज निर्मितीचा प्रयत्न केला होता. बालाजी टेलिफिल्मसची ‘बोल निती बोल’, ही वेबसिरीज तेव्हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली होती. कारण, या वेबसिरीजमधील Why girls can’t watch a porn movie हा एकच एपिसोड प्रचंड गाजला होता. त्यावेळी तब्बल दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी हा एपिसोड पाहिला होता. मात्र, वेबसिरीजसचे उर्वरित भाग प्रेक्षकांच्या फारसे पसंतीस उतरले नव्हते.

तत्पूर्वी 2008 मध्ये रेडिफ आणि पिक्सेलक्राफ्ट यांनी भारतातील ‘राम अँण्ड रिया’ हा देशातील पहिला वेबकॉम शो लाँच केला होता. तीन मिनिटांची ही स्किटस सध्याच्या भारतीय वेबसिरीजसचा पाया ठरला होता.

(Indian Web series and OTT platforms)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.