Nick Jonas बद्दल आमिर खानच्या लेकीचं मोठं वक्तव्य; प्रियांकाला होवू शकते अडचण
होणाऱ्या पतीला सोडून निक जोनस याच्याबद्दल आसं का म्हणाली आयरा? आमिर खान याची लेक एका पोस्टमुळे पुन्हा चर्चेत
मुंबई : सध्या सर्वत्र उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ग्रँड ओपनिंग सेरेमनीची चर्चा तुफान रंगत आहे. या क्रार्यक्रमासाठी अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अंबानी यांच्या कार्यक्रमात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनस देखील उपस्थित होता. या ग्रँड ओपनिंग सेरेमनीमध्ये प्रियांकाने पती निक यांच्यासोबत एन्ट्री केली आणि सर्वांच्या नजरा दोघांकडे येवून थांबल्या. तर दुसरीकडे आमिर खान याचं कुटुंब देखील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर कर्याक्रमासाठी आलं होतं. कार्यक्रमादरम्यान आयरा हिने एक फोटो पोस्ट केला आहे आणि निक याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र आ.राच्या पोस्टची चर्ची सुरु आहे.
आयरा हिने इन्स्टाग्रामवर प्रियांका हिचा पती निक याच्यासोबत एक खास फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये आयरा निकसोबत पोझ देताना दिसत आहे. आयराने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर निक देखील सूट-बूटमध्ये रुबाबदार दिसत आहे. आयराने फक्त निक याच्यासोबत फोटो पोस्ट केला नाही तर, पती नुपूर शिखरे याला देखील टॅग केलं आहे.
सोशल मीडियावर निक याच्यासोबत फोटो शेअर करत आयराने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या तरुणपणातील प्रेम…’ असं लिहिलं आहे. आयराची पोस्ट पाहून प्रत्येक जण हैराण आहे. पुढे नुपूरला टॅग करत आयरा म्हणाली, ‘मला माहिती आहे… मी तुला ओळखते… तुला माहिती आहे, हे मला माहिती आहे.. फक्त मला जाणून घ्यायचं आहे…’
गेल्या वर्षी झाला आयरा आणि नुपूर यांचा साखरपुडा आयरा आणि नुपूर यांचा साखरपुडा गेल्या वर्षी मोठ्या थाटात साखरपुडा केला. नुपूर आणि आयरा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. ज्यानंतर २०२२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. फार कमी लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला.
आयरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आयरा कायम तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या पोस्टला अनेकांनी पसंती मिळते, पण आयराला ट्रोल करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.