‘बरं झालं ते नातं संपलं..’; आमिर खान-रिना दत्ताच्या घटस्फोटावर लेक आयरा स्पष्टच म्हणाली..

आमिर खान आणि रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान ही मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे बोलत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी आणि त्याचा तिच्यावर झालेल्या परिणामाविषयी व्यक्त झाले.

'बरं झालं ते नातं संपलं..'; आमिर खान-रिना दत्ताच्या घटस्फोटावर लेक आयरा स्पष्टच म्हणाली..
Aamir Khan, Ira Khan and Reena DuttaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 11:04 AM

अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने काही महिन्यांपूर्वी प्रियकर नुपूर शिखरेशी लग्न केलं. आयरा ही मेंटल हेल्थ सपोर्ट ऑर्गनायझेशनची संस्थापक आणि सीईओ आहे. ती अनेकदा मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयरा तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी आणि त्याकाळात तिचं मानसिक आरोग्य कसं होतं, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आमिरने 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पण 2002 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी 2005 मध्ये दुसरं लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयराने सांगितलं की तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा तिच्या मानसिक आरोग्यावर विशेष परिणाम झाला नाही. ती म्हणाली, “ते कधीच आमच्यासमोर भांडले नाहीत. मुलांसाठी दोघं नेहमी एकत्र यायचे आणि त्यांच्या स्वत:च्या तक्रारी दूर ठेवायचे. त्यांच्या नात्यात समस्या असूनही ते कुटुंब म्हणून नेहमी सोबत असायचे.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

याविषयी आयरा पुढे म्हणाली, “मला वाटलं नव्हतं की घटस्फोटसुद्धा माझ्यावर नकारात्मक परिणाम करणारी गोष्ट असू शकते. मला मोठी झाल्यानंतर समजलं की नातेसंबंध योग्य पद्धतीने संपवणंही खूप गरजेचं असतं. ते कदाचित चांगल्यासाठी संपलं असेल. माझ्या आईवडिलांचं नातंही चांगल्यासाठीच संपलं असेल. मी जेव्हा माझ्या डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा मला समजलं की कोणालाही दोष देण्याची गरज नाही. जे घडलं ते स्वीकारता आलं पाहिजे. आपली मुलं सुरक्षित राहावीत यासाठी त्यांनीही बराच त्याग केलाय. ते विभक्त होत असले तरी आम्हाला समान प्रेम मिळेल याची खात्री त्यांनी केली.”

आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.