Naga Chaitanya | समंथाशी घटस्फोटाच्या 2 वर्षांनंतर नाग चैतन्य दुसऱ्यांदा करणार लग्न? बिझनेसमनची मुलगी पसंत?

अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे, असं कळतंय. समंथाला घटस्फोट दिल्याच्या दोन वर्षांनंतर तो एका बिझनेसमनच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Naga Chaitanya | समंथाशी घटस्फोटाच्या 2 वर्षांनंतर नाग चैतन्य दुसऱ्यांदा करणार लग्न? बिझनेसमनची मुलगी पसंत?
Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 4:40 PM

हैदराबाद | 14 सप्टेंबर 2023 : अभिनेता नाग चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2017 मध्ये या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं आणि लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. 2021 मध्ये नाग चैतन्य आणि समंथाने घटस्फोट जाहीर केला. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर आता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्यास सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं जात होतं. मात्र नाग चैतन्यचं दुसरं लग्न सोभिताशी होणार नाही. त्याच्या या दुसऱ्या लग्नाची प्लॅनिंग वडील नागार्जुन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागार्जुन यांनी मुलासाठी एका मोठ्या बिझनेसमनच्या मुलीला पसंत केलं आहे. तिचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. मात्र या वृत्ताविषयी अद्याप त्यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही. नाग चैतन्य आणि समंथाने जेव्हा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटस्फोटानंतर समंथा तिच्या करिअर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू लागली आहे. तर दुसरीकडे नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभिताला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र या रिलेशनशिपविषयी दोघांनी अद्याप मौन सोडलं नाही.

नाग चैतन्य आणि सोभिताला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर त्याने सोभिताला नवीन घर दाखवण्यासाठीही नेलं होतं. त्याचवेळी त्याने तिची आईवडिलांशी भेट करून दिली. मात्र डेटिंगबद्दल अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, असंच दोघंजण म्हणत आले आहेत.

हे सुद्धा वाचा

समंथासोबतच्या घटस्फोटाविषयी नाग चैतन्य एका मुलाखतीत म्हणाला, “आम्ही विभक्त होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तर घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया वर्षभरापूर्वी पार पडली. कोर्टाने आमचा घटस्फोट मंजूर केला. आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. मला माझ्या आयुष्यातील त्या काळासाठी प्रचंड आदर आहे. ती खूप प्रेमळ मुलगी आहे आणि तिने तिच्या आयुष्यात खुश राहावं हीच माझी इच्छा आहे. मात्र जेव्हा माध्यमांमध्ये चर्चा सुरू होतात, अफवा पसरवल्या जातात तेव्हा आम्हा दोघांमधील गोष्टी विचित्र होतात. लोकांच्या नजरेत मग एकमेकांविषयीचा आदर नाहीसा होतो. त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.