Samantha: समंथा दुसऱ्यांदा संसार थाटण्याच्या तयारीत? करणार आयुष्याची नवी सुरुवात?

भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्यास समंथा तयार? लवकरच लग्न करणार!

Samantha: समंथा दुसऱ्यांदा संसार थाटण्याच्या तयारीत? करणार आयुष्याची नवी सुरुवात?
Samantha Ruth PrabhuImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 4:18 PM

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच समंथा त्वचेच्या एका आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तिच्या मॅनेजरने या चर्चा नंतर फेटाळल्या. त्याचसोबतच काही कामानिमित्त ती परदेशाला जाणार असल्याचंही कळतंय. या सर्व चर्चांदरम्यान आता समंथा तिच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात समंथा आणि नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांनी घटस्फोट (Divorce) घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता समंथाने भूतकाळाच्या गोष्टी मागे सोडत आयुष्यात नवं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

समंथा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. इतकंच नव्हे तर ती कुठल्याही कार्यक्रमातही दिसली नाही. अशा परिस्थितीत आता तिच्याशी संबंधित एका बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. समंथा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याची ही चर्चा आहे. समंथा नाग चैतन्यसोबतचा तिचा भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

हे सुद्धा वाचा

समंथा जग्गी वासूदेव अर्थात सदगुरू यांना गुरू मानते. त्यांनीच तिला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. एवढंच नाही तर समंथानेही त्यांचा हा सल्ला मान्य केल्याचं कळतंय. भूतकाळातील कटू आठवणी विसरून समंथाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी सदगुरू सतत प्रेरित करत असतात. त्यानुसार आता तिने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप समंथाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

समंथाचा ‘खुशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी ती परदेशी जाणार आहे. तिचं परदेशी जाण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र त्वचेशी संबंधित आजारावर उपचार घेण्यासाठी ती अमेरिकेला जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.