Shah Rukh Khan | शाहरुख खान विकणार ‘मन्नत’ बंगला? चाहत्याला दिलेलं उत्तर वाचून नेटकरी थक्क!

| Updated on: Jan 30, 2023 | 4:28 PM

ज्यावेळी शाहरुखचे चित्रपट एकानंतर एक फ्लॉप होत होते, तेव्हा त्याच्यावर 'मन्नत' बंगला विकण्याची वेळ आल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांवर अखेर किंग खाननेच उत्तर दिलं होतं. त्याने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Shah Rukh Khan | शाहरुख खान विकणार मन्नत बंगला? चाहत्याला दिलेलं उत्तर वाचून नेटकरी थक्क!
शाहरुख खान विकणार 'मन्नत' बंगला? चाहत्याला दिलेलं उत्तर वाचून नेटकरी थक्क!
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आता जरी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत असला तरी काही वर्षांपूर्वी त्याचे चित्रपट दणक्यात आपटत होते. 2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुखने जवळपास चार वर्षांचा ब्रेक घेतला आणि आता पठाणच्या निमित्ताने कमबॅक केलं. ज्यावेळी शाहरुखचे चित्रपट एकानंतर एक फ्लॉप होत होते, तेव्हा त्याच्यावर ‘मन्नत’ बंगला विकण्याची वेळ आल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांवर अखेर किंग खाननेच उत्तर दिलं होतं. त्याने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

‘पठाण’ला दमदार प्रतिसाद मिळत असतानाच शाहरुखचं ते जुनं ट्विट आता व्हायरल होऊ लागलं आहे. शाहरुखने ज्यावेळी चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता, तेव्हा तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असायचा. #AskSRK या सेशनअंतर्गत ट्विटरवर चाहते त्याला विविध प्रश्न विचारायचे आणि शाहरुख त्यांची उत्तरं अत्यंत मजेशीर पद्धतीने द्यायचा.

हे सुद्धा वाचा

2020 मध्ये अशाच एका सेशनअंतर्गत चाहत्याने शाहरुखला ‘मन्नत’ बंगल्याविषयी प्रश्न विचारला होता. ‘भाई मन्नत बेचने वाले हो क्या’ (मन्नत बंगला विकणार आहेस का?), असा प्रश्न युजरने त्याला विचारला होता. त्यावर शाहरुख दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली होती. ‘भाई मन्नत बिकती नहीं, सर झुका कर मांगी जाती है.. याद रखोगे तो लाइफ मे कुछ पा सकोगे’ (भावा, मन्नत विकली जात नाही तर मान झुकवून मागितली जाते. हे लक्षात ठेवशील तर आयुष्यात काहीतरी कमावू शकशील) असं उत्तर शाहरुखने दिलं होतं. शाहरुखचं हे उत्तर वाचून चाहत्याची बोलतीच बंद झाली होती.