ईशा अंबानींच्या होळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींच्या जलवा, प्रियांका पासून शिल्पा पर्यंत… पाहा व्हिडीओ

सेलिब्रिटींमध्ये होळीची लगबग सुरु... ईशा अंबानींच्या होळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींच्या जलवा... सेलिब्रिटींच्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा अंबानी यांच्या पार्टीची चर्चा...

ईशा अंबानींच्या होळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींच्या जलवा, प्रियांका पासून शिल्पा पर्यंत... पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 12:40 PM

मुंबई | 16 मार्च 2024 : रंगांचा सण म्हणजे होळी जवळ येत आहे. सर्वसामान्यांसोबतच स्टार्सही हा सण साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. झगमगत्या विश्वात तर होळीची लगबग सुरु देखील झाली आहे. होळी सण साजरा करण्यासाठी सेलिब्रिटी हाय प्रोफाईल पार्टीचं आयोजन करण्यात येतं. पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटी एकाच ठिकाणी जमा होतात आणि पार्टीचा आनंद लुटतात आणि होळी पर्ट्यांची सुरुवात झाली आहे. नुकताच, प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने होळी पार्टीचं आयोजन केलं.

ईशा अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. परदेशातून आलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने देखील पार्टीमध्ये उपस्थिती दर्शवली होती. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ईशा अंबानी यांच्या अर्बन पार्टीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, ऑरी, अथिया शेट्टी, माधुरी दीक्षित यांसारख्या अनेक सेलिब्रिटी देखील आले होते. पार्टीत उपस्थित राहण्यासाठी सेलिब्रिटींनी केलेला खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

झगमगत्या विश्वात ईशा अंबानी यांनी यंदाच्या वर्षी होळी पार्टीची सुरुवात केली आहे. आता कोणते सेलिब्रिटी होळी पार्टीचं आयोजर करतील याकडे सर्वांच लक्ष लागलं. झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी एकत्र प्रत्येक सणाचा आनंद घेत असतात. दिवाळी, होळी, गणपती अनेक सण बॉलिवूडमध्ये मोठ्या थाटात साजरे केले जातात. आता सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा अंबानी यांच्या होळी पार्टीची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अंबानी यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन जामनगर येथे मोठ्या थाटात पार पडला. सेलिब्रेशनसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै रोजी होणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.