12 बेडरुम, 24 बाथरुम,लग्झरी सुविधा; ईशा अंबानीने 500 कोटींना बंगला विकला; या प्रसिद्ध गायिकीने केलं खरेदी
ईशा अंबानीने तिचा बंगला एका प्रसिद्ध गायिकेला चक्क 500 कोटींना विकला आहे. या बंगल्यात लग्झरी सुविधा उपलब्ध असून.एखाद्या माहालापेक्षा हा बंगला कमी नाहीये.
मुंबईसोबतच मुंबई किंवा भारताच्याही बाहेर अनेक सेलिब्रेटीची बंगले आहेत. ज्या बंगल्यांमध्ये लग्झरी सुविधाही असलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये एका घराची चर्चा आहे ती म्हणजे ईशा अंबानी यांचा अमेरिकेत असलेल्या आलिशान बंगला. तो नुकताच त्यांनी विकला असून तो तब्बल 500 कोटींना विकला आहे
500 कोटींना विकलं घर
ईशा अंबानीनं अमेरिकेत असलेलं तिचं आलिशान घर विकलं आहे. ईशानं अंबानीनं प्रेग्नंसीच्या काळात याच घरात वेल घालवला होता. हेच घर आता तिने 500 कोटींना विकलं आहे. हे घर जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक या जोडप्याने खरेदी केलं आहे.
ईशा अंबानीचं हे घर अमेरिकेच्या लॉस एंजेल्सच्या उच्चभ्रू वसती असलेल्या बेवर्ली हिल्समध्ये स्थित आहे. या घरात ईशा आणि त्यांची आई नीता अंबानी देखीलसोबत राहिल्या होत्या. ईशा अंबानीच्या या घरात 12 बेडरुम, 24 बाथरुम, इंडोर पिकलबॉल कोर्ट, जिम, सलून, स्पा, 155 फूट लांब पूल आणि इतर अशाच बऱ्याच लग्झरी सुविधा आहेत. जेनिफल लोपेजनं हे घर खरेदी केल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. घराच्या बाहेर मनोरंजन पवेलियन, किचन आणि लॉन सारख्या अनेक सुविधा देखील उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात.
बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये.
दरम्यान हे घर 38,000 स्क्वेअर फूटवर बांधण्यात आलेला आलिशान बंगला आहे. हा बंगला पाहायला येणारे लोकं ते पाहातच बसतात.इतकी या बंगल्याची सुंदरता पाहायला मिळते. हा बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये.
जेनिफर लोपेजनं बेन एफ्लेकशी 2022 मध्ये चौथं लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेज ही स्वत: अब्जाधीश आहे. जेनिफर 3332 कोटींची मालकीण आहे. जेनिफरनं तिच्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. आता ती अमेरिकेची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका आहे. तिचे चाहते हे भारतातही मोठ्या संख्येनं आहेत.