तिने मुलीसोबत घर सोडलं.. घटस्फोटाबद्दल ईशा कोपिकरच्या पतीची प्रतिक्रिया समोर

14 वर्षांच्या संसारानंतर अभिनेत्री ईशा कोपिकर पती टिम्मी नारंगपासून विभक्त झाली. घटस्फोटानंतर टिम्मीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. नऊ वर्षांच्या मुलीसोबत ईशाने घर सोडल्याचं त्याने सांगितलंय. इतकंच नव्हे तर गेल्या दीड वर्षापासून दोघं घटस्फोटाबद्दल विचार करत होते, असंही तो म्हणाला.

तिने मुलीसोबत घर सोडलं.. घटस्फोटाबद्दल ईशा कोपिकरच्या पतीची प्रतिक्रिया समोर
ईशा कोपिकरचा घटस्फोटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 9:54 AM

मुंबई : 8 जानेवारी 2024 | ‘खल्लास गर्ल’ म्हणून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री ईशा कोपिकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशाच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. 14 वर्षांच्या संसारानंतर तिने पती टिम्मी नारंगला घटस्फोट दिला आहे. या दोघांना रियाना ही मुलगी आहे. आता घटस्फोटाबद्दल टिम्मीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. घटस्फोटानंतर आपल्या नऊ वर्षांच्या मुलीला घेऊन ईशा घराबाहेर पडल्याचं त्याने सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत टिम्मी म्हणाला, “जवळपास दीड वर्षापर्यंत आम्ही घटस्फोटाच्या निर्णयावर विचार करत होतो. त्यानंतरच हे पाऊल उचललं आहे. आम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच अधिकृतरित्या विभक्त झालो आहोत. हा घटस्फोट परस्पर संमतीनेच झाला आहे. आता आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतंत्र आहोत. यात काही शंका नाही.” ईशा कोपिकर ही घटस्फोटाच्या कायदेशीर बाबींबद्दल विचार करत असल्याची चर्चा होती. त्याबद्दल बोलताना टिम्मी पुढे म्हणाला, “मी हे रिपोर्ट्स अद्याप वाचले नाहीत. पण कायदेशीर बाबींबद्दल विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा घटस्फोट आधीच झाला आहे.”

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे ईशाने तिच्या घटस्फोटाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. टिम्मी आणि ईशा यांच्यात बऱ्याच गोष्टींवरून पटत नसल्याने सतत भांडणं व्हायची, अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिली आहे. दोघांनी नात्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. अखेर ईशाने मुलीला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

ईशा आणि टिम्मी यांची पहिली ओळख एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट करण्यापूर्वी दोघं तीन वर्षांपर्यंत चांगले मित्र होते. 2009 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या 14 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले आहेत. त्यांनी नऊ वर्षांना रियाना ही मुलगी आहे. 2002 मध्ये ‘कंपनी’ या चित्रपटातील ‘खल्लास’ या गाण्यामुळे ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘डरना मना है’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘हम तुम’, ‘क्या कुल है हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ईशा आणि रोहित हे अधिकृतरित्या विभक्त झाले असले तरी अद्याप इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने तिच्या नावापुढील नारंग हे आडनाव काढलेलं नाही.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.