Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरातील लाईट बंद होताच ईशा – समर्थ यांचा रोमान्स, व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात सर्वांसमोर रंगला ईशा - समर्थ यांचा रोमान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण... व्हिडीओवर चाहते कमेंट करत देत आहेत प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र ईशा, समर्थ, अभिषेक यांच्या नात्याची चर्चा... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : ‘बिग बॉस 17’ सध्या तुफान चर्चात आहे. ‘दिल, दिमाग और दम’ या थिमवर आधारित असलेला ‘बिग बॉस 17’ प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. शोचा आता चौथ आठवडा सुरु झाला आहे. ‘दिल, दिमाग और दम’ शोच्या या थिम दरम्यान स्पर्धक ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. ‘बिग बॉस 17’ मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लाईव्ह फिडच्या कॅमेऱ्यांमध्ये ईशा आणि समर्थ यांचा रोमान्स कैद झाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि समर्थ यांची चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये समर्थ आणि ईशा बेडवर झोपलेले दिसत आहे. तर दोघांमध्ये रंगलेला रोमान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ईशा आणि समर्थ एकमेकांसोबत असताना त्या ठिकाणी अभिषेक स्वतःची ब्लँककीट घेण्यासाठी त्याठिकाणी येतो. तेव्हा ईशा – समर्थ यांना एक बेडवर पाहून अभिषेक दोघांना कॅमेरा सुरु असल्याची आठवण करुन देतो.
त्यानंतर अभिषेक याने जे काही पाहिलेलं असतं, ते सर्वकाही अभिषेक, खानजादी हिला जाऊन सांगतो. ‘दोघांना एकत्र पाहून मला फार वाईट वाटलं…’ असं अभिषेक म्हणाला. ईशा – समर्थ यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी देखील व्हायरल व्हिडीओवर कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.
Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 4, 2023
बिग बॉस 17 फेम ईशा-समर्थ यांची व्हायरल क्लिप X (ट्विटर)वर व्हायरल होत आहे. बिग बॉस फॅनपेजवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘निब्बा निब्बी बिग बॉस आता वेगळ्या शोमध्ये बदलत आहे…’ असं लिहिलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ईशा-समर्थला जोरदार ट्रोल केले आहे.
व्हायरल व्हिडीओ कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘१९ वर्षांची मुलगी इतकी निर्लज्ज कशी असू शकते?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ईशाने स्वत:चं जेवढं नुकसान केलं आहे तेवढी कोणीही स्वतःची प्रतिमा खराब केली नसेल…’ सध्या सर्वत्र ईशा आणि समर्थ यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
बिग बॉसच्या घरातून अरुण मशेट्टी, समर्थ जुरेल, सना रईस खान, ईशा मालवीय आणि मनस्वी ममगाई यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. कमी मतांमुळे मनस्वी बाहेर पडली. मनस्वी हिने बिग बॉसचा निरोप घेतल्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला. अरुण आणि सनी यांनी अभिषेकला लक्ष्य करण्यास सुरुवात केलं. एवढंच नाही तर त्यांच्यात जोरदार भांडण देखील झालं.