बिग बॉसच्या टॉयलेट्समध्ये असते ‘ही’ गोष्ट, ज्यामुळे…, ईशा मालवीय हिचा मोठा खुलासा

Bigg Boss : बिग बॉसच्या टॉयलेट्समध्ये स्पर्धकांना राहावं लागतं सावधान? टॉयलेटमध्ये असते 'अशी' गोष्ट... ईशा मालवीय हिच्याकडून मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा मालवीय हिच्या वक्तव्याची चर्चा..

बिग बॉसच्या टॉयलेट्समध्ये असते 'ही' गोष्ट, ज्यामुळे..., ईशा मालवीय हिचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 9:29 AM

Bigg Boss : अभिनेत्री ईशा मालवीय ‘बिग बॉस 17’ शोमधील दमदार स्पर्धक होती. शोमधील अभिनेत्रीचा प्रवास फार सोपा नव्हता.. पण ईशा कायम ‘बिग बॉस 17’ शोची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत होती. पण ईशा हिचं स्वप्न पूर्ण झालं. बिग बॉस आता संपला आहे. पण बिग बॉसच्या घरातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी समोर येत आहेत. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये ईशा हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आहे…

बिग बॉसमध्ये असलेल्या माईकबद्दल भारती हिने ईशा हिला प्रश्न विचारला. ईशा म्हणाली, ‘माझ्याकडून एक चूक झाली होती. मी वॉशरुममध्ये जाऊन प्रचंड रडली होती. तेव्हा मी वॉशरुममध्ये माईक घेऊन गेली होती…’ यावर भारती म्हणाली, ‘शोमध्ये टॉयलेटमध्ये देखील माईक घेऊन जायचा असतो का?’

भारतीच्या या प्रश्नाचं उत्तर देत ईशा म्हणाली, ‘वॉशरुममध्ये माईक घेऊन जाण्याची काहीही गरज नसते. पण लोकं विसरुन जातात माईक काढणं… पण बिग बॉसच्या टॉयलेटमध्ये देखील माईल लागलेले असतात. टॉयलेटमध्ये एक माईक असतो, जर कोणी रडत असेल किंवा काही बोलत असेल तर, ते सगळं काही रेकॉर्ड होतं…’

‘बिग बॉस’च्या घरातील टॉयलेटमध्ये देखील माईक असल्याची गोष्ट ऐकत भारती आणि हर्ष देखील हैराण होतात. ईशा हिने बिग बॉसच्या घराबद्दल केलेलं वक्तव्य जाणून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

ईशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शोमध्ये फक्त आणि फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अभिनेता अभिषेक कुमार आणि समर्थ जुरेल यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री चर्चेत होती. शोमधील ईशा आणि समर्थ यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली.

ईशा आणि समर्थ यांचे अनेक इंटिमेट व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. चाहत्यांनी देखील दोघांच्या व्हिडीओवर संताप व्यक्त केला. ईशा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.