ईशा मालवीयने दिली प्रियांका चोप्रा हिच्या बहिणीला मोठी धमकी, थेट मनारा चोप्रा हिच्या अंगावर..
बिग बाॅस 17 च्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत. नुकताच बिग बाॅस 17 च्या घरात एक टास्क पार पडलाय. यानंतर ईशा आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसली. यावेळी ईशा ही कारण नसताना देखील मनारा चोप्रा हिला भांडताना दिसली. आता याचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
मुंबई : बिग बाॅस 17 च्या घरात जोरदार हंगामे होताना दिसत आहेत. बिग बाॅस 17 चा फिनाले आता जवळ आलाय. संपूर्ण सीजनमध्ये चांगले मित्र म्हणून राहणारे स्पर्धेक देखील आता जोरदार भांडणे करताना दिसत आहेत. हेच नाही तर आता नुकताच बिग बाॅस 17 च्या घरात जोरदार भांडणे ही बघायला मिळाली. मनारा चोप्राची टीम थेट बिग बाॅस 17 च्या फायनलिस्ट झालीये. यामुळे आता घरात चांगलीच भांडणे ही बघायला मिळत आहेत. मनारा चोप्रा आणि ईशा मालवीय यांच्यामध्ये ही भांडणे झाली आहेत. हेच नाही तर अंकिता आणि मुनव्वर फारूकी यांच्यामध्येही भांडणे झाली.
बिग बाॅस 17 च्या घरात नुकताच टॉर्चर टास्क पार पडलाय. यावेळी मनारा चोप्रा हिची टीम विजेता झाली. या टॉर्चर टास्कनंतर घरातील वातावरण हे चांगलेच तापल्याचे बघायला मिळतंय. थेट फायनलिस्ट बनता आले नसल्याने ईशा, अंकिता लोखंडे, विकी जैन आणि आयशा खान हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळतंय.
ईशा हिने थेट आपला मोर्चा मनारा चोप्रा हिच्याकडे वळवला. ईशा ही मनारा चोप्रा हिला बऱ्याच गोष्टी बोलताना दिसली. हेच नाही तर ईशा ही थेट मनारा चोप्रा हिला म्हणते की, अनडिजर्विंग आहेस. मुनव्वर फारूकी याच्यामुळेच इथंपर्यंत पोहल्याचा आरोप करताना ईशा ही दिसत आहे. यावेळी मनारा देखील ईशा हिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहे.
हेच नाही तर ईशाचे बोलणे ऐकून मनारा तिला पागल असल्याचे म्हणताना दिसते. यानंतर ईशा ही थेट मनारा चोप्रा हिला कानाखाली मारण्याची थेट धमकीच देते. यानंतर मनारा चोप्रा आणि ईशा यांच्यामधील वाद हा चांगलाच वाढताना दिसतोय. ईशा म्हणते की, हळूहळू गुलामी करत फिनालेपर्यंत ही मनारा चोप्रा पोहचली आहे.
हेच नाही तर ईशा यावेळी बॉडी शेम करताना देखील दिसत आहे. 30 वर्षांची लहान मुलगी ईशा ही मनारा चोप्रा हिला म्हणते. आता याचा एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या वादानंतर ईशा हिला नेटकरी हे खडेबोल सुनावताना दिसत आहेत. फिनाले जवळ आल्यापासून बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत.