अमिताभ बच्चन यांना केबीसीमध्येच जखमेवर मीठ चोळणारा सवाल; ईशानच्या सवालाने महानायक गारद
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच थेट आपल्या चाहत्याच्या गाडीवर फिरताना मुंबईमध्ये अमिताभ बच्चन दिसले.
मुंबई : अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. हेच नाही तर सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांच्या संपर्कात दिसतात. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा गुडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा चित्रपट धमाका करताना देखील दिसला. अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपतीमधूनही आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन हे करतात.
सध्या कौन बनेगा करोडपती सीजन 15 (KBC 15) धमाका करताना दिसतंय. अनेक लोक हे कौन बनेगा करोडपती फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्यासाठी बघतात. नुकताच शोमध्ये एक मोठा धमाका होताना दिसतोय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते हे या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
नुकताच कौन बनेगा करोडपती सीजन 15 च्या 96 व्या एपिसोडमध्ये क्रिकेटर ईशान किसन हा सहभागी झाला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत हाॅट सीटवर ईशान किसन हा बसलेला दिसतोय. विशेष म्हणजे यावेळी अमिताभ बच्चन आणि ईशान किसन हे धमाका करताना दिसले. हेच नाही तर थेट अमिताभ बच्चन यांनाच मोठा प्रश्न करताना ईशान किसन हा दिसला.
Amitji ne Ishaan ke prashn ka uttar bohot soch samajh ke diya! 😝
Dekhiye #KaunBanegaCrorepati Somvaar-Shukravaar raat 9 baje sirf #SonyEntertainmentTelevision par. #KaunBanegaCrorepati #KBConSony #KBConSonyEntertainmentTelevision #NewBeginning @SrBachchan #IshanKrishan pic.twitter.com/r5efAGXkD1
— sonytv (@SonyTV) December 24, 2023
अमिताभ बच्चन यांना ईशान किसन याने असा प्रश्न विचारला की, सर्वजण हैराण झाले. ईशान किसन म्हणाला की, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्यासाठी मी काही पर्याय देतो, त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. खुदा गवाह, सरकार, डॉन आणि शहंशाह यापैकी एक टायटल तुम्हाला जया बच्चन मॅडमला द्यावे.
ईशान किसन याचे हे बोलणे ऐकून उपस्थित लोक हे हसायला लागतात. यावर अमिताभ बच्चन हे म्हणाले की, सरकार हे टायटल मी देईल. लग्न झालेले लोक याबद्दल नक्कीच समजू शकतात. अमिताभ बच्चन यांनी दिलेले उत्तर ऐकून सर्वजण हसायला लागतात. अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या विधानाची आता जोरदार चर्चा ही होताना दिसत आहेत.