आशिष विद्यार्थींनंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीकडून लग्नाचा खुलासा; 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं लग्न

अभिनयात पदार्पण करण्याआधी स्नेहल अँकर होती. एकदा ती दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ती करत होती आणि त्यावेळी राजकीय नेते तिथे पोहोचले होते.

आशिष विद्यार्थींनंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीकडून लग्नाचा खुलासा; 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं लग्न
Snehal RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 10:32 AM

मुंबई : अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या लग्नाबद्दलची चर्चा अद्याप शमली नसतानाच एका टीव्ही अभिनेत्रीने आपल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. ‘इश्क का रंग सफेद’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री स्नेहल राय हिने राजकीय नेते माधवेंद्र राय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र या दोघांचं लग्न आता नाही तर तब्बल दहा वर्षांपूर्वीच झालं आहे. दहा वर्षांनंतर आता स्नेहलने तिच्या लग्नबद्दल खुलासा केला आहे. विशेष म्हणजे स्नेहल तिच्या पतीपेक्षा वयाने 21 वर्षे लहान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्नेहलने तिची लव्हस्टोरी, तिच्या पतीसोबतची पहिली भेट आणि लग्नापर्यंतचा प्रवास याविषयी सांगितलं. यासोबतच दहा वर्षांपर्यंत लग्नाचं वृत्त का लपवलं, याचाही तिने खुलासा केला.

वयाच्या 23 व्या वर्षी केलं लग्न

“मी माझ्या लग्नाबद्दलची गोष्ट लपवली नाही. किंबहुना मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल कधी सार्वजनिकरित्या चर्चा केली नाही. मी माझ्या वैवाहिक आयुष्यात खूप खुश आहे. मी फक्त माझ्या लग्नालाच माझी ओळख मानत नाही. मी वयाच्या 23 व्या वर्षी लग्न केलं. पण लग्न केल्याने करिअर संपतं, यावर माझा विश्वास नाही. मला हे चुकीचे विचार वाटतात”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

स्नेहलने तिच्या करिअरची सुरुवात लग्नानंतर केली होती. त्यावेळी सासरच्यांकडून काय प्रतिक्रिया होती असं विचारलं असता ती पुढे म्हणाली, “एके दिवशी रात्री उशिरा मला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला आणि त्याने कामाविषयी विचारलं. माझे पती माझ्या सुरक्षेबद्दल आणि घरी परतण्याबद्दल चिंता करू लागले होते. मात्र इंडस्ट्रीचं काम कसं असतं हे त्यांना नीट ठाऊक आहे.”

स्नेहल रायची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. तिची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. अभिनयात पदार्पण करण्याआधी स्नेहल अँकर होती. एकदा ती दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ती करत होती आणि त्यावेळी राजकीय नेते तिथे पोहोचले होते. व्हीआयपी पाहुण्यांच्या नावाचा उल्लेख करताना माधवेंद्र हे नाव उच्चारताना ती अडखळली होती. त्यानंतर फ्लाइटमध्येही दोघं सोबत होते. इथूनच दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....