Israel Hamas war | क्षणार्धात हास्याचं भीतीत रुपांतर; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वीचा नुशरत भरुचाचा व्हिडीओ समोर
इस्रायलमधील काही भाग अद्याप हमासच्या नियंत्रणात असून काही नागरिकांना तिथं ओलीस ठेवण्यात आलं आहे. हमासने चढवलेल्या या हल्ल्यात ठार झालेल्या इस्रायली नागरिकांची संख्या 600 वर पोहोचल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला.
जेरुसलेम | 9 ऑक्टोबर 2023 : गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शंभर जण ठार झाले. तर दुसरीकडे इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर केलेल्यया हल्ल्यात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टींनीनी केला. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले आहेत. किनारी भागाभोवतीच्या सीमेवर हमास आणि इस्रायली सैनिकांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेत्यान्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली आणि शत्रूला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. या युद्धाच्या परिस्थितीत अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री नुशरत भरुचा हिला सुरक्षित भारतात परत आणलं गेलं. नुशरत एका पुरस्कार सोहळात सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यापूर्वीचा असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये नुशरत तिच्या सहकाऱ्यांसोबत बॉलिवूड गाणं गाताना पाहायला मिळतेय.
‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री नुशरत भरूचा इस्रायलमध्ये अडकली होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याचं टीमने सांगितलं होतं. मात्र ॲम्बेसीसोबत बातचित झाल्यानंतर नुशरत इस्रायल एअरपोर्टवर पोहोचली आणि त्यानंतर रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत एका कनेक्टिंग फ्लाइटने ती भारतात परतली. मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर नुशरतच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट पाहायला मिळत होती.
हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ
Akelli premieres in Israel with @Nushrratt and @TsahiHalevi @IsraelinIndia @indemtel pic.twitter.com/665hY4Zg9P
— Anat Bernstein-Reich🇮🇱🇮🇳🇱🇰 (@BernsteinReich) October 4, 2023
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापूर्वीच्या व्हिडीओमध्ये नुशरत प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट ‘याराना’मधील ‘तेरे जैसा यार कहाँ..’ हे गाणं गाताना दिसत आहे. इस्रायलमध्ये हायफा (HAIFA) पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये नुशरतच्या ‘अकेली’ चित्रपटाचं स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ती तिथे असलेल्या उपस्थितांची भेट घेत होती. या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये नुशरतच्या चेहऱ्यावर जे हास्य पहायला मिळतंय, ते हल्ल्यानंतर भीतीत रुपांतर झालं.
हल्ल्यापूर्वीचे फोटो
Indian film #Akelli premiere at Haifa International Film Festival 2023 !!
DCM Rajiv Bodwade and Mayor of Haifa @EINATkalisch attended the premiere.
Best wishes to Israeli actors @TsahiHalevi, #AmirBoutrous, Indian actress @Nushrratt and the entire team of the film. pic.twitter.com/YdP0HwiwNp
— India in Israel (@indemtel) October 5, 2023
मुंबई एअरपोर्टवर उतरल्यानंतर जेव्हा पापाराझींनी नुशरतची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती त्यांना इतकंच म्हणाली, “मी सध्या प्रचंड घाबरलेली आहे. कृपया मला आधी घरी सुरक्षित पोहोचू द्या.” इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी लेबनानमधील दहशतवादी गट ‘हेजबोला’ने तीन इस्रायली तळांवर हल्ले चढवले. त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळला आहे. तर हमासच्या हल्ल्यात ठार झालेल्या इस्रायली नागरिकांची संख्या 600 वर गेल्याची माहिती आहे.