बिकिनी घालून ये…, हॉटेलमध्ये बोलावलं त्यानंतर…, अभिनेत्रीचे प्रसिद्ध सेलिब्रिटीवर गंभीर आरोप
Sanaya Irani on casting couch: बिकिनी घालून ये..., सर नाराज होतील..., अभिनेत्रीचे प्रसिद्ध सेलिब्रिटीवर गंभीर आरोप, म्हणाली, 'हॉटेलमध्ये बोलावलं त्यानंतर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री सांगितलेल्या धक्कादायक घटनेची चर्चा...
‘कसम से’, ‘छनछन’, ‘इस प्यार को क्या नाव दुं’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सनाया ईराणी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सनाया हिची चर्चा असायची. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सनाया बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सनाया हिने करियरबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सनाया हिने झगमगत्या विश्वातील कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला आहे. शिवाय ओटीटी विश्वात आता करियर करायचं असल्याची इच्छा देखील अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. सनाया हिला एका निर्मात्याने मुख्य भूमिकेसाठी विचारलं होतं. सनाया म्हणाली, ‘मझ्या मॅनेजरने मला सांगितलं होतं, सर नाजार होती एकदा ते काय म्हणत आहेत ऐकून घे आणि त्यांना जाऊन भेट… मी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला…’
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी मला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. अनेक निर्मात्यांना पाहिलं आहे, जे अभिनेत्रींना हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावतात आणि ती बेटपर्यंत जाणार की नाही पाहातात… मी त्या निर्मात्याला भेटण्यासाठी गेली. आमच्यात बोलणं झालं. बोलणं सुरु असताना त्याने माझ्यासोबत उद्धटपणे बोलायला सुरुवात केली. त्याला माझा राग येऊ लागला होता. सिनेमातील एक भूमिकेसाठी तुला विचारत आहे… असं तो मला म्हणाला….’
View this post on Instagram
‘त्याने मला बिकिनी घालून येण्यास सांगितलं… तेव्हा मला समजलं होतं, मी त्याला खडसावून सांगितलं, तू देत असलेल्या भूमिकेत आणि तुझ्या कामात मला काहीही रस नाही… आणि मी तेथून निघून आली…’ असं सनाया ईराणी म्हणाली. याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊच सारख्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे…
सनाया ईराणी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2016 मध्ये अभनेता मोहित सहगल याच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे. पण अद्याप सनाया हिने बेबी प्लानिंग केली नाही. सनाया कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.