घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय हिने घेतला ‘तो’ मोठा निर्णय?, अभिनेत्रीला पाहताच चाहते हैराण, चक्क…
Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce : अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला नक्कीच दिली आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल सध्या विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात मोठा वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. खासगी आयुष्यात मोठे वादळ आलेले असतानाच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच विदेशात जाताना दिसली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आर्शिवाद सेरेमनीनंतर ती विदेशात गेली. आता नुकताच ऐश्वर्या राय ही भारतामध्ये परतलीये. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसले.
सतत घटस्फोटाची चर्चा असताना ऐश्वर्या राय हिचे मुंबई एअरपोर्टवरील फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. ऐश्वर्या राय ही विदेशात शस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्याची जोरदार चर्चा आहे. ऐश्वर्या राय ही विदेशात जात असताना तिचा चेहरा वेगळा दिसत होता आणि परतल्यानंतर तिच्या चेहऱ्यामध्ये मोठा बदल झाल्याचे सांगितले जातंय.
ऐश्वर्या राय हिच्या चेहऱ्यावर अगोदर फॅट दिसत होता. मात्र, ज्यावेळी ती विदेशातून परत भारतामध्ये आली, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील सर्व फॅट गायब झाल्याचे बघायला मिळतंय. मात्र, खरोखरच ऐश्वर्या राय ही विदेशातून शस्त्रक्रिया करून आली का? याबद्दल तसा काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. फक्त तशी चर्चा आहे.
वाढलेल्या वजनामुळे अनेक लोक हे ऐश्वर्या रायला वजन कमी करण्याचा सल्ला देताना दिसले. आता तिच्या चेहऱ्यामध्ये मोठा बदल दिसतोय. यामुळे तिने शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिच्यासोबत विदेशात आराध्या बच्चन ही देखील गेली होती. ऐश्वर्या राय आणि आराध्या नेहमीच स्पॉट होताना दिसतात.
ऐश्वर्या राय ही अनंत अंबानी याच्या लग्नामध्ये बच्चन कुटुंबियांसोबत नाही तर चक्क मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत सहभागी झाली. अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता नंदा आणि तिचे मुले एकत्र लग्नात दाखल झाले होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. खरोखरच यांचा घटस्फोट होणार का हा प्रश्नही विचारला जातोय.