बच्चन कुटुंबाची मुलगी होणं प्रचंड कठीण? असं का म्हणाली बिग बींची लेक?

अमिताभ बच्चन - जया बच्चन यांची लेकं असणं का आहे कठीण? बच्चन कुटुंबाच्या लेकीचं मोठं वक्तव्य... नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्वेताने मोठा खुलासा केला आहे. बिग बींची लेक असल्यामुळे श्वेता बच्चन असते कायम चर्चेत...

बच्चन कुटुंबाची मुलगी होणं प्रचंड कठीण? असं का म्हणाली बिग बींची लेक?
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 1:11 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण श्वेता बच्चन हिने कायम स्वतः झगमगत्या विश्वापासून दूर ठेवलं. श्वेता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला नाही, पण अनेक पार्ट्यांमध्ये कार्यक्रमांमध्ये श्वेता बच्चन दिसते. आता श्वेता म्हणते, अतीयशस्वी कुटुंबात जन्माला येणं फार कठीण आहे.

श्वेता म्हणाली, ‘माझ्यावर आई – वडिलांनी कधीच करियरबद्दल दबाव टाकला नाही. पण तरी देखील मला भीती वाटत होती.’ श्वेता हिची लेक नव्या नवेली नंदा हिने पॉडकास्ट शो ‘व्हाट द हेल नव्या’मध्ये आईला एक प्रश्न विचारला. ‘अपयश मिळाल्यानंतर त्याचा तुझ्यावर काहीही परिणाम होत नाही?’

प्रश्नाचं उत्तर देत श्वेता म्हणाली, ‘असं कोण आहे ज्याला अपयश मिळाल्यानंतर फरक पडत नाही. विशेषतः माझ्यासारख्या लोकांना का फरक पडणार नाही. जे अतीयशस्वी कुटुंबातील असतात. असं कधीच झालं नाही, माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर दबाव टाकला. मला कायम सांगण्यात आलं तुला जे करायचं आहे ते कर… पण तुम्हाला काहीतरी करावं असं वाटायला हवं…’

हे सुद्धा वाचा

‘तुम्हाला स्वतःला त्यासाठी लायक करायला हवं. नाहीतर मग करुच नका. आपण आपल्या भोवती अनेकांना पाहतो, त्यांनी काय काय मिळवलं आहे… माझी नव्या आणि अगस्त्य यांच्यासोबत भांडणं होतात. तेव्हा माझ्या मनात विचार येतात, मी आई म्हणून अपयशी झाली आहे का?’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता नंदा हिची चर्चा रंगली आहे.

बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसापूर्वी अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता हिला ‘बंगला’ भेट म्हणून दिल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटांच्या चर्चांनी जोर धरला.. पण रंगणाऱ्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही… पण अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.