जगातील सुंदर महिलेचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन ; कलाविश्वाला मोठा धक्का

अभिनेत्री ते जर्नलिस्ट क्षेत्रामध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेचं वर्चस्व; वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का

जगातील सुंदर महिलेचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन ; कलाविश्वाला मोठा धक्का
जगातील सुंदर महिलेचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन ; कलाविश्वाला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 2:57 PM

मुंबई : कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून ओळख असलेल्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन झालं आहे. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीना यांना एका सिनेमामुळे जगातील सर्वात सुंदर महिला असल्याचा मान देण्यात आला. जीना लोलोब्रिगिडा यांच्या निधनामुळे हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. जीना यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठा धक्का बसला आहे. जीना लोलोब्रिगिडा यांच्या निधनामुळे सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

जीना लोलोब्रिगिडा यांनी १६ जानेवारी २०२३ मध्ये अखेरचा श्वास घेतला. एक काळ असा होता जेव्हा जीना लोलोब्रिगिडा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. आजही त्यांच्या सिनेमांच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगतात. जीना लोलोब्रिगिडा यांचा जन्म ४ जुलै १९२७ साली एका फर्निचर कारागिरीच्या घरात झाला.

जीना लोलोब्रिगिडा यांचं तरुणपण युद्धाकाळात गेलं. जीना लोलोब्रिगिडा यांच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हतं. पण जीना लोलोब्रिगिडा यांनी एक अभिनेत्री म्हणून स्वतःच्या करियरची सुरुवात केली. जीना लोलोब्रिगिडा यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली.

दुसऱ्या विश्व युद्धानंतर जेव्हा इटलीमध्ये सिनेमे साकारण्यात सुरुवात झाली, तेव्हा जीना लोलोब्रिगिडा तुफान चर्चेत आल्या. अभिनय क्षेत्रात जेव्हा जीना लोलोब्रिगिडा यांना अपयशाचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी आपल्या करियरची दिशा बदलली.

अभिनेत्री आणि सुंदर महिला म्हणून लोकप्रियता मिळवण्यानंतर जीना लोलोब्रिगिडा यांनी जर्नलिस्ट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या क्षेत्रात देखील जीना लोलोब्रिगिडा यांना यश मिळालं.

जीना लोलोब्रिगिडा यांनी त्यांच्या करियरमध्ये ‘ब्लॅक ईगल’, ‘कम सप्टेंबर’, ‘ट्रेपीज’, ‘अलार्म बेल्स’, ‘बीट द डेविल’, ‘बुओना सेरा’ आणि ‘मॅड अबाउट ओपेरा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय त्यांना ‘कम सप्टेंबर’ सिनेमासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारने सन्मानित देखील करण्यात आलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.