घटस्फोटानंतर Imran Khan याच्या आयुष्यात सुंदर महिलेची एन्ट्री ? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र खळबळ

घटस्फोटानंतर ‘जाने तू या जाने ना’ फेम अभिनेता इम्रान खानचा एका महिलेसोबत खास व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण; अभिनेत्यासोबत कोण आहे ती?

घटस्फोटानंतर Imran Khan याच्या आयुष्यात सुंदर महिलेची एन्ट्री ? 'तो' व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र खळबळ
Imran Khan
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 11:00 AM

Imran Khan New Video : अभिनेता इम्रान खान (Imran Khan) याने ‘जाने तू या जाने ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्याच्या पहिल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण त्यानंतर अभिनेत्याला अभिनय क्षेत्रात मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील अभिनेता सक्रिय नसतो. त्यामुळे इम्रान खान काय करतो, कुठे असते? याची माहिती चाहत्यांना नव्हती. बॉविवूडमध्ये सतत येणारं अपयश आणि घटस्फोटामुळे अभिनेता चर्चेत होता. त्यानंतर इम्रान खान झगमगत्या विश्वात कुठे हरवला होता, हे देखील कोणाला महिती नव्हतं.

गेल्या वर्षी अभिनेता पत्नी अवंतिका मलिक हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर चर्चेत होता. तर इम्रान खान आमिर खान याची मुलगी आयरा खान हिच्या साखरपुड्याच्या दिवशी दिसला. त्यानंतर नुकताच अभिनेत्याला एका महिलेसोबत स्पॉट करण्यात आलं. सध्या अभिनेत्याचा त्या महिलेसोबत व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इम्रान याच्या सोबत व्हिडीओमध्ये दिसणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वाशिंग्टन आहे. व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांसोबत हातात हात घालून चाहलताना दिसत आहेत. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इम्रान आणि लेखा एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न चाहते उपस्थित करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

इम्रान खान याचे सिनेमे इम्रान खान याने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू… या जाने ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इम्रान २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी बट्टी’ सिनेमातून चाहत्यांच्य भेटीस आला. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर कधी दिसला नाही. इम्रान याने ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘देल्ही बेली’ सिनेमात कमालीची कामगिरी केली. त्यानंतर अभिनेत्याने आता स्वतःचा मोर्चा सिनेमा लेखण आणि दिग्दर्शनाच्या दिशेने वळवला आहे.

इम्रान खान याचा घटस्फोट अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान (Imran Khan) आणि अवंतिका मलिकशी (Avantika Malik) २०११ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांना एक मुलगी आहे. इमारा असं तिचं नाव आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं, पण लग्नानंतर दोघांचं नातं फार टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. इम्रानचे विवाहबाह्य संबंध हे दोघांच्या विभक्त होण्यामागचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं होतं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.