मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज (jacqueline fernandez) हिने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. जॅकलीन फर्नांडिज हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिवेत्री वादाच्या भोवऱ्याड अडकली आहे. शिवाय २०० कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग (money laundering case) प्रकरणी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतच जॅकलीन फर्नांडिज हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. याप्रकरणी रोज नवीन अपडेट समोर येत असतात. ज्यामुळे अभिनेत्रीची चाहत्यांमध्ये कायम चर्चा रंगलेली असते. जॅकलीन फर्नांडिज आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचं नाव आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत जोडण्यात आल्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, जॅकलीन फर्नांडिज हिने न्यायालयाकडे एक अर्ज दाखल केला होता. अर्जामध्य अभिनेत्री दुबईमध्ये जाण्याची परवानगी मागितली होती. याप्रकरणी दिल्ली येथील पटियाला हाउस कोर्ट (Patiala House Court) ने जॅकलीन फर्नांडिज हिला दुबई याठिकाणी जाण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जॅकलीन फर्नांडिज हिला दुबईमध्ये जाता येणार आहे.
Rs 200 crore money laundering case | Delhi’s Patiala House Court allows actor Jacqueline Fernandez to travel to Dubai to attend a conference
— ANI (@ANI) January 27, 2023
दिल्ली येथील पटियाला हाउस कोर्ट जॅकलीन फर्नांडिज हिला दुबईमध्ये जाण्याची परवागनी दिली आहे. पण काही अटी जॅकलीन फर्नांडिज हिला पाळाव्या लागणार आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जॅकलीन हिला ती ज्याठिकाणी आहे, त्या जागेची माहिती सतत द्यावी लागणार आहे. सध्या याप्रकरणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
जॅकलीन फर्नांडिज हिला २७ ते ३० जानेवारी पर्यंच पेप्सिको इंडिया सम्मेलनात हजर राहायचं होतं. प्रोफेशनल कमिटमेंटमुळे जॅकलीन हिने फर्नांडिज न्यायालयात याचिका दाखल केली होती. अभिनेत्रीने दाखल केलेल्या याचिकेला न्यायालयाने मंजूरी दिली आहे. यावर शुक्रवारी न्यायालयाने निर्णय सुनावला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर अभिनेत्रीला दुबईमध्ये जाता येणार आहे.
रिपोर्टनुसार न्यायाधीश म्हणतात, ‘जॅकलिन हिच्यावर गंभीर आरोप आहेत, याची कल्पना आम्हाला आहे. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी मुख्य मार्गावर आहे. जॅकलीन फर्नांडिज ऑस्कर पुरस्कारासाठी देखील नॉमिनेटेड झाली आहे. म्हणून अभिनेत्रीला दुबईला जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.’
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील वेग-वेगळ्या अंदाजातील आहेत. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.