जॅकलिन फर्नांडिस हिच्या फोटोवर कमेंट करणे मीका सिंग याला पडले अत्यंत महागात, थेट सुकेश चंद्रशेखर याने…
जॅकलिन फर्नांडिस ही नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन फर्नांडिस ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिस ही काही वर्षे सुकेश चंद्रशेखर याला डेट करताना दिसली. जॅकलिन फर्नांडिस हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये.
मुंबई : सुकेश चंद्रशेखर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या जेलमध्ये आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्यावर गंभीर आरोप सतत केले जातायंत. सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात थेट जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचे नाव आल्याने लोकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर हा 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस ही देखील सहभागी असल्याचे सांगितले गेले.
याच प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची अनेकदा चाैकशी देखील झालीये. जॅकलिन फर्नांडिस चाैकशीसाठी बऱ्याच वेळा ईडीच्या कार्यालयात पोहचली. जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आरोपी म्हणून या प्रकरणात घेण्यात आले. फक्त जॅकलिन फर्नांडिस हिच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री या सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात होत्या.
धक्कादायक म्हणजे सुकेश चंद्रशेखर याला भेटण्यासाठी बऱ्याच अभिनेत्री थेट जेलमध्येही गेल्या. जॅकलिन फर्नांडिस हिला तर थेट सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, जॅकलिन फर्नांडिस हिच्यासमोर सुकेश चंद्रशेखर याचे सत्यसमोर आल्यापासून तिला देखील धक्का बसला. तिने स्पष्ट केले की, सुकेश चंद्रशेखर हा कोणत्या मार्गाने पैसे कमावत होता, याची मला अजिबातच कल्पना नव्हती.
सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला अत्यंत महागडे गिफ्ट दिले. जॅकलिन फर्नांडिस हिने हॉलिवूड स्टार जीन क्लाउड वॅन डेम याच्यासोबत एक खास फोटो शेअर केला. तेंव्हापासून सतत एक चर्चा आहे की, जीन क्लाउड वॅन डेम याला जॅकलिन फर्नांडिस ही डेट करत आहे. जॅकलिन फर्नांडिस ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे गेलीये.
दुसरीकडे सुकेश चंद्रशेखर हा कायमच जॅकलिन फर्नांडिस हिला जेलमधून प्रेमपत्र पाठवताना दिसतो. जॅकलिन फर्नांडिस हिने शेअर केलेल्या फोटोवर गायक आणि रॅपर मीका सिंग याने एक कमेंट करत मोठा धक्का दिला. मीका सिंग याने जीन क्लाउड वॅन डेम आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या फोटोवर थेट लिहिले की, सुकेश चंद्रशेखर याच्यापेक्षा हा चांगलाच आहे. मात्र, काही वेळाने मीका सिंग याने ही कमेंट डिलीट देखील केली.
आता मीका सिंग याला ही कमेंट करणे महागात पडल्याचे स्पष्ट दितंय. कारण सुकेश चंद्रशेखर याने लीगल नोटिस मीका सिंग याला पाठवलीये. यामुळे आता मीका सिंह याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट आहे. आजही सुकेश चंद्रशेखर हा जॅकलिन फर्नांडिस हिच्या प्रेमात आहे. तो नेहमीच जॅकलिन फर्नांडिस हिला पत्र पाठवताना दिसतो. इतकेच नाही तर तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही खास पत्र त्याने पाठवले होते.