“जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही?”, कोर्टाने ईडीला फटकारलं
कुठे गेले अब्जावधी रुपये?, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाचा ईडीला सवाल
दिल्ली- 200 कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गुरुवारी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात पोहोचली. जॅकलिनच्या जामिनाच्या याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. कोर्टाने याप्रकरणी जॅकलिनच्या जामिनावरील आदेश उद्यासाठी राखून ठेवला आहे. याआधी तिला मनी लाँड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन सुनावण्यात आली होती. या जामिनाचा विरोध करताना ईडीने सांगितलं की जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि तपासात सहकार्य केलं नाही. तर जॅकलिननेही यावेळी ईडीवर गंभीर आरोप केले.
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आज कोर्टात जामिन अर्जावर सुनावणी झाली. याआधी ईडीने जॅकलिनच्या जामिनाचा विरोध केला होता. जॅकलिनने तपासादरम्यान देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ईडीने केला.
“जॅकलिनने तपासात कधीच सहकार्य केलं नाही. पुरावे सादर केले तेव्हाच खुलासा केला. तपासादरम्यान तिची वागणूक ठीक नव्हती. ती पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड करू शकते. याप्रकरणी जेव्हा तिला इतर आरोपींसमोर बसवून प्रश्न विचारले गेले, तेव्हाच तिने कबुली दिली”, असं ईडीने म्हटलंय.
Actor Jacqueline Fernandez arrives at Delhi's Patiala House Court in connection with the Rs 200 crore money laundering case involving conman Sukesh Chandrashekar.
Court will, today, hear arguments on the bail petition moved by her. pic.twitter.com/5slp08E7dy
— ANI (@ANI) November 10, 2022
जॅकलिनचे ईडीवर आरोप
दुसरीकडे जॅकलिननेही ईडीवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं तिने म्हटलंय. जॅकलिन तपासात पूर्ण सहकार्य करतेय. मात्र ईडी तिला विनाकारण त्रास देतेय, असं तिच्या वकिलाने कोर्टात म्हटलंय.
#WATCH | Actor Jacqueline Fernandez arrives at Delhi's Patiala House Court in connection with the Rs 200 crore money laundering case involving conman Sukesh Chandrashekar.
The court will, today, hear arguments on the bail petition moved by her. pic.twitter.com/3U0FKVvwLl
— ANI (@ANI) November 10, 2022
डिसेंबर 2021 मध्ये जॅकलिनने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असं ईडीने सांगितलं. ती पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. ईडीची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने प्रश्न केला की जर त्यांच्याकडे जॅकलिनविरोधात पुरावे होते तर त्यांना अटक का नाही केली?